ओतूरला ९ हजार ३८७ कांदा पिशव्यांची आवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:15 AM2021-02-23T04:15:41+5:302021-02-23T04:15:41+5:30
ओतूर : येथील उपबाजारात रविवारी फक्त ९ हजार ३८७ नवीन कांदा पिशव्यांची आवक झाली. आवक कमी झाल्यामुळे ...
ओतूर : येथील उपबाजारात रविवारी फक्त ९ हजार ३८७ नवीन कांदा पिशव्यांची आवक झाली. आवक कमी झाल्यामुळे भावात सरासरी १० किलोस प्रतवारीनुसार १० रुपयांची थोडीशी वाढ झाली आहे. कांदा नं. १ गोळा यास प्रतवारीनुसार १० किलोस ३८० ते ४३१ रुपये बाजारभाव मिळाला, अशी माहिती जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अँड संजय काळे व उपसभापती दिलीप डुंबरे यांनी दिली.
रविवारी प्रतवारीनुसार १० किलो कांदा बाजारभाव खालील : कांदा नं १ गोळा - ३८० ते ४३१ रुपये.
कांदा नं २ - ३३० ते ३८० रुपये.
कांदा नं. ३ गोल्टा- २५० ते ३३० रुपये.
कांदा नं ४ बदला- ५० ते २५० रुपये.
बटाटा बाजार: रविवारी ओतूर उपबाजार आवारात ३२८ बटाटा पिशव्यांची आवक झाली. प्रतवारीनुसार १० किलोस ५० ते १८० रुपये बाजारभाव मिळाला. भाव स्थिर राहिले, अशी माहिती ओतूर मार्केटचे कार्यालय प्रमुख दीपक मस्करे यांनी सांगितले.