भोर शहरातील गटर, काँक्रीट रस्त्याची ९० टक्के कामे मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:10 AM2021-03-23T04:10:02+5:302021-03-23T04:10:02+5:30

भोर शहरातील श्रीपतीनगर येथील भिलारे घर ते भांडेघर ते आवारे प्लॉट येथील सुमारे २४ लाख रु. काँक्रीट रस्ता बंदिस्त ...

90% of gutter and concrete road works in Bhor city | भोर शहरातील गटर, काँक्रीट रस्त्याची ९० टक्के कामे मार्गी

भोर शहरातील गटर, काँक्रीट रस्त्याची ९० टक्के कामे मार्गी

Next

भोर शहरातील श्रीपतीनगर येथील भिलारे घर ते भांडेघर ते आवारे प्लॉट येथील सुमारे २४ लाख रु. काँक्रीट रस्ता बंदिस्त गटर काम व शिवाजी हाउसिंग सोसायटी येथील २६ लाख रु. रस्ता व गटर कामाचे भूमिपूजन नगराध्यक्ष निर्मला आवारे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी आर्किटेक मंगेश शिंदे, नगरसेविका वृषाली घोरपडे, देवीदास गायकवाड, रामचंद्र आवारे, मंगेश शिंदे, मनिषा ओंबळे, कुणाल पलंगे, किरण पवार, विशाल भांडे, सुदाम ओंबळे, श्री काळभर उपस्थित होते.

भोर शहरातील ९० टक्के काँक्रीट रस्ते व बंदिस्त पाइपची गटारे कामे झाली असून चौपाटी येथील शिवाजी महाराजांचा पुतळा परिसर सुधारणा, एसटी स्टँडवरील स्वागत कमान सेल्फी पॉइंट, नगरपलिकेची सुसज्ज इमारत, अग्निशमन यंत्र व वाहनतळ जागा अशी कोट्यवधी रुपयांची कामे आमदार संग्राम थोपटे यांच्या माध्यमातून झाली. पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्यात आहे. शहरात अनेक कामे सुरू आहेत. भोर शहराच्या सर्वांगीण विकासाबरोबरच स्वच्छ सुंदर शहर करणार असल्याचे भोरच्या नगराध्यक्ष आवारे यांनी सांगितले.

Web Title: 90% of gutter and concrete road works in Bhor city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.