डिंभे धरणात ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात पावसाची ओढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:13 AM2021-08-24T04:13:43+5:302021-08-24T04:13:43+5:30
डिंभे : डिंभे धरणाची पाणी पातळी आज मितीस ७१७.१०३ एवढी झाली असून, धरणात ९०.४३ टक्के पाणीसाठा झाला आहे. मागील ...
डिंभे : डिंभे धरणाची पाणी पातळी आज मितीस ७१७.१०३ एवढी झाली असून, धरणात ९०.४३ टक्के पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षी याच तारखेला धरणात केवळ ८९.१२ टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक होता. चालू हंगामात धरण पाणलोट क्षेत्रात एकूण ७२३ मी. मी. एवढा पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. मात्र, सध्या धरण क्षेत्रातून पावसाने काढता पाय घेतला असून धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अधिक पावसाची आवश्यकता आहे.
आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरणात आज मितीस ९०.४३ टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणाची पाणीपातळी ७१७.१०३ वर आली असली तरी मागील आठ दिवसांपासून धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने ओढ दिली आहे. ५ ऑगस्टपासून धरणाच्या पाणीसाठ्यात संथ गतीने वाढ होत असून धरणात जवळपास दररोज केवळ १ टक्क्याने वाढ होत आहे. जुलैला या धरणात केवळ २९.६६ टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक होता. परिसरात केवळ ३०० मी. मी. पाऊस झाला होता. मात्र, २१ जुलैपासून मुसळधार पावसास सुरुवात झाल्याने केवळ एका दिवसात ३८ मी. मी पाऊस होऊन धरणसाठा ३३.७९ टक्क्यांवर गेला होता. २० जुलैपासून धरणातील पाणीपातळी झपाट्याने वाढत होती. २० जुलैला धरणात २९.६६ टक्के एवढा असलेला पाणीसाठी ३१ जुलैपर्यंत ७६ टक्क्यांवर गेला होता. केवळ या दहा दिवसांतच धरणसाठ्यात खऱ्या अर्थाने वाढ झाली. या दहा दिवसांत धरणातील पाणीसाठ्यात जवळपास ४६ टक्क्यांनी वाढ झाली; मात्र त्यानंतर धरणातील पाणीसाठ्या संथगतीने वाढ होत आहे. १ ऑगस्टला धरणात ७८ .३९ टक्के एवढा पाणसाठा होता. आज २३ ऑगस्टला धरणात ९०.४३ एवढा पाणीसाठा झाला आहे. म्हणजेच पुढील २३ दिवसांत धरणात केवळ १२.०४ टक्के एवढाच पाणीसाठा जमा झाला आहे.
मागील आठवडे भराची धरणा जमा होत असलेला पाणीसाठा व पावसाची टक्केवारी पुढीलप्रमाणे.
तारीख १७ ऑगस्ट धरणाची पातळी ७१६.७८० धरण पाणीसाठा ८८.७९ टक्के, झालेला एकूण पाऊस ० मी.मी.
तारीख १८ ऑगस्ट धरणाची पातळी ७१६.७९० धरण पाणीसाठा ८८.८३ टक्के, झालेला एकूण पाऊस १ मी.मी.
तारीख १९ ऑगस्ट धरणाची पातळी ७१६.७८० धरण पाणीसाठा ८८.७९टक्के, झालेला एकूण पाऊस ३ मी.मी.
तारीख २० ऑगस्ट धरणाची पातळी ७१६.८८० धरण पाणीसाठा ८९.२६टक्के, झालेला एकूण पाऊस २ मी.मी.
तारीख २१ ऑगस्ट धरणाची पातळी ७१६.९९० धरण पाणीसाठा ८९.७७ टक्के, झालेला एकूण पाऊस ४ मी.मी.
तारीख २२ ऑगस्ट धरणाची पातळी ७१७.१३० धरण पाणीसाठा ९०.४३ टक्के, झालेला एकूण पाऊस १ मी.मी.
तारीख २३ ऑगस्ट धरणाची पातळी ७१७.१३० धरण पाणीसाठा ९०.४३ टक्के, झालेला एकूण पाऊस ० मी.मी.
डिंभे धरणार सध्या ९०.४३ टक्के पाणीसाठा झाला असून मागील आठ दिवसांत धरणात केवळ अवघ्या दीड टक्क्यांनी वाढ झाली आहे. (छायाचित्र-कांताराम भवारी)