सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून ९० हजार रोपांची होणार लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:18 AM2021-05-05T04:18:10+5:302021-05-05T04:18:10+5:30
सामाजिक वनीकरण विभागाची चांडोली आणि गोनवडी येथे रोपवाटिका असून, चांडोली येथील रोपवाटिकेत ३० हजार आणि गोनवडी येथील रोपवाटिकेत ६० ...
सामाजिक वनीकरण विभागाची चांडोली आणि गोनवडी येथे रोपवाटिका असून, चांडोली येथील रोपवाटिकेत ३० हजार आणि गोनवडी येथील रोपवाटिकेत ६० हजार विविध प्रकारची रोपे तयार आहेत.
९० हजार रोपांपैकी ६० हजार रोपांची लागवड सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून केली जाणार असून उर्वरित ३० हजार रोपे विविध ग्रामपंचायती, सामाजिक संस्था यांना त्यांच्या मागणीनुसार दिली जाणार आहेत.
सामाजिक वनीकरण पुणे विभागाचे वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे, पुणे विभागाचे वनाधिकारी पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी हे उद्दिष्ट पार पाडले जाणार असल्याचे वनक्षेत्रपाल तनुजा शेलार यांनी सांगितले. वनपाल गुलाब मुके यांच्या देखरेखीखाली ही रोपे चांडोली आणि गोनवडी येथे तयार केली जात आहेत.
--
चौकट
सुवर्ण पिंपळ आपल्या मंदिरी -
सामाजिक वनीकरण विभागाचे वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या विभागाने आळंदी येथील भाविकांचे श्रध्दास्थान आणि आठशे वर्षाची परंपरा असणाऱ्या सुवर्ण पिंपळाचे बी गोळा करून त्याची रोपे तयार केली आहेत. भाविकांनी आपल्या घरापुढे किंवा तीर्थक्षेत्र असणाऱ्या ठिकाणी तुळशीच्या रोपाप्रमाणे जर या रोपांची लागवड केली तर धार्मिक भावना जपली जाईल आणि वृक्षलागवड केली जाईल अशी भावना नाईकडे यांनी व्यक्त केली. या माध्यमातून भविकांशी संपर्क साधला जाईल.
--------------------------------------------------------
फोटो क्रमांक : ०४ आंबेठाण वनीकरण विभाग रोपे
फोटो - वनीकरण विभागाच्या रोपवाटिकेतील तयार रोपे.