Corona Vaccination Certificate: 'या' नंबरवर मेसेज करा अन् तातडीने मिळवा कोरोना लसीकरणाचे प्रमाणपत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2021 01:14 PM2021-12-12T13:14:58+5:302021-12-12T13:57:10+5:30

भारत सरकरने दिलेल्या या हेल्पलाईन 9013151515 या नंबरवरून आपण सर्टिफिकेट मिळवू शकतो

9013151515 this number to get corona vaccination certificate immediately | Corona Vaccination Certificate: 'या' नंबरवर मेसेज करा अन् तातडीने मिळवा कोरोना लसीकरणाचे प्रमाणपत्र

Corona Vaccination Certificate: 'या' नंबरवर मेसेज करा अन् तातडीने मिळवा कोरोना लसीकरणाचे प्रमाणपत्र

Next

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने लसीचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक केले आहे. कोरोनाचा प्रसार आटोक्यात येत असताना निर्बंधात सूट देण्यात आली आहे. परंतु शॉपिंग मॉल, सिनेमागृह, नाट्यगृह अशा ठिकाणी फक्त लसीचे दोन डोस घेतलेल्या लोकांना परवानगी दिली जात आहे. अशा गर्दीच्या ठिकाणी प्रवेश करताना नागरिकांकडून कोरोना प्रतिबंधक लसीचे सर्टिफिकेट मागितले जाते. पण असंख्य नागरिक लसीचे दोन्ही डोस घेतलेले सर्टिफिकेट जवळ ठेवत नाहीत. अशा वेळी भारत सरकरने दिलेल्या '9013151515' या हेल्पलाईन नंबरवरून आपण सर्टिफिकेट तातडीने मिळवू शकतो. 

अनेक वेळा चित्रपट अथवा नाटक पाहायला गेल्यावर त्याबाहेरील सुरक्षारक्षक सर्टिफिकेट मागितल्याशिवाय आता प्रवेश करून येत नाहीत. अशा वेळी नागरिकांना मोबाईलमध्ये सर्टिफिकेटची पीडीएफ अथवा जवळपास सर्टिफिकेट आहे का? याची शोधाशोध करावी लागते. पण आता भारतसरकारने दिलेल्या वरील हेल्पलाईन वरून आपण एक ते दीड मिनिटात दोन्ही डोस घेतलेल्या सर्टिफिकेटची पीडीएफ मिळवू शकतो. 

कसे मिळवणार सर्टिफिकेट 

१. सुरुवातीला '9013151515' हा नंबर मोबाईलमध्ये सेव करून घ्या. त्यानंतर व्हाट्स अँप मध्ये जाऊन या नंबरवर 'certificate' असा मेसेज करा. 
२. त्याच नंबरवरून तुम्हाला ओटीपीचा टेक्स्ट मेसेज येईल. 
३. तो ओटीपी पुन्हा वरील व्हाट्स अँप नंबरवर पाठवा.  
४. त्यानंतर तुम्ही कोवीन अँपवर तुमची आणि तुमच्या कुटुंबातील व्यक्तींची नावनोंदणी केली असेल. त्याबद्दल नंबरनुसार सर्वांच्या नावाचा मेसेज येईल. 
५. तुम्हाला हवे असणाऱ्या व्यक्तीचा नंबर त्यावर पाठवल्यास तातडीने सर्टिफिकेटची पीडीएफ उपलब्ध होईल.   

Web Title: 9013151515 this number to get corona vaccination certificate immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.