खेड तालुक्यात ९०२ मुले कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:10 AM2021-06-02T04:10:30+5:302021-06-02T04:10:30+5:30
जानेवारी ते मे २०२१ या पाच महिन्यांत तालुक्यात शून्य गटात ४ मुले, १ वर्षाची १६, दोन वर्षांची ३७, ३ ...
जानेवारी ते मे २०२१ या पाच महिन्यांत तालुक्यात शून्य गटात ४ मुले, १ वर्षाची १६, दोन वर्षांची ३७, ३ वर्षांची ३२, ४ वर्षांची २७, ५ वर्षांची ४०, ६ वर्षांची ३५, ७ वर्षांची ३३, ८ वर्षांची ४४, ९ वर्षांची २९, १० वर्षांची ४३, ११ वर्षांची ५३, १२ वर्षांची ५९, १३ वर्षांची ५७, १४ वर्षांची ५९, १५ वर्षांची ६३, १६ वर्षांची ६५, १७ वर्षांची ९० आणि १८ वर्षांची ११६ मुले मुली कोरोनाबाधित होऊन उपचार घेऊन बरी झाली. ही दिलासादायक बाब असली, तरी तिसऱ्या लाटेत लहान मुलांची आरोग्याची काळजी आई- वडिलांनी घेण्यासाठी सर्व नियम पाळून आपले दैनंदिन व्यवहार सुरू ठेवले पाहिजे असे असताना कोरोनाची रुग्णसंख्या घसरत असताना अनेक जण पुन्हा बेफिकिरपणा करू लागल्याचे दिसून येत आहे.