रेमडेसिव्हीर इंजेक्शनविना ९१ वर्षीय आजोबांनी सकारात्मक विचारानेच केली कोरोनावर मात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 12:10 PM2021-05-07T12:10:04+5:302021-05-07T15:02:45+5:30

इच्छाशक्ती मजबूत असल्याने त्यांना प्लाझ्मा किंवा रेमडेसिव्हीरची लागली नाही गरज

The 91-year-old grandfather overcame Corona with a positive thought without a remedial injection | रेमडेसिव्हीर इंजेक्शनविना ९१ वर्षीय आजोबांनी सकारात्मक विचारानेच केली कोरोनावर मात

रेमडेसिव्हीर इंजेक्शनविना ९१ वर्षीय आजोबांनी सकारात्मक विचारानेच केली कोरोनावर मात

Next
ठळक मुद्देडॉक्टरांच्या उपचाराला प्रतिसाद देत पूर्णपणे बरे झाले

धनकवडी: सकारात्मक विचारानेच रुग्ण कोरोना मुक्त होऊ शकते. याचे उदाहरण धनकवडीमध्ये पाहायला मिळाले.  कोरोनाच्या अत्यवस्थ रुग्णांना बरे करण्यासाठी सर्वत्र रेमडेसिव्हीर इंजेक्शनची मागणी केली जात आहे. धनकवडी येथील डॉ. शिवाजीराव कदम नगर मध्ये राहणाऱ्या ९१ वर्षांच्या आजोबांनी (वसंतराव पिसाळ) रेमडेसिविर इंजेक्शन शिवाय कोरोना वर मात केली. शेतीकाम, सायकल चालवण्याचा छंद, आनंदी मनोवृत्ती, साई स्नेह कोविड सेंटरमधील डॉक्टरांनी केलेल्या अथक प्रयत्न, त्यांचे सकारात्मक विचार यामुळे ते कोरोनावर मात करण्यात यशस्वी ठरले.

वसंतराव पिसाळ मुंबई येथून निवृत्त झाल्यानंतर धनकवडीत राहण्यास आले. पत्नी, मुलगा, सून आणि नातवंडांसमवेत ते धनकवडीत राहत होते. काही वर्षांपूर्वीच त्यांच्या पत्नीचे निधन झाले. मात्र एकटेपणा जाणवू नये म्हणून त्यांनी गावी शेतीकाम आणि सायकल चालवण्याचा छंद जोपासला आणि हिच दिनचर्या आणि मेहनत कोरोनाशी दोन हात करण्यास कामी आली. 

दरम्यान दहा बारा दिवसांपूर्वी वसंतराव पिसाळ यांना सर्दी, ताप, खोकला व अशक्तपणा जाणवत होता. म्हणून पिसाळ कुटुंबातील सदस्यांनी त्यांची कोरोना चाचणी करून घेतली. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यातच त्यांना अस्थमा असल्याने व्हेंटिलेटरसज्ज खाट असलेल्या रुग्णालयात दाखल करण्याची सुचना करण्यात आली होती. मात्र कुठेही खाट उपलब्ध नसल्याने त्यांना कात्रज येथील साईस्नेह हाँस्पीटलमध्ये दाखल करून उपचार सुरू करण्यात आले. दरम्यान रेमेडेसिविर चा तुटवडा असल्याने त्याच्या वापरा शिवाय त्यांच्यावर उपचार सुरू होते. पिसाळ यांची इच्छाशक्ती मजबूत असल्याने त्यांना प्लाझ्मा किंवा रेमडेसिव्हीरची गरज लागली नाही. आठ दिवसांच्या  उपचारानंतर ते पूर्ण बरे झाले."

यावेळी साई स्नेह कोविड केअर सेंटरचे डॉ. सुनील जगताप म्हणाले,  "कोविड साथीच्या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन आम्ही हॉटेल रॉयलचे रुपांतर साई स्नेह कोविड केअर सेंटरमध्ये केले. दाखल करण्यात आलेल्या कोविड रुग्णांना प्रोटोकॉल नुसार तसेच आयसीएमआर गाईडलाईन नुसार रक्त पातळ होण्याची औषधे दिली. अँटी फंगल ट्रीटमेंटही दिली. मुख्यतः पिसाळ आजोबांनी आमच्या उपचाराला उत्तम प्रतिसाद दिल्यामुळे कोरोनावर मात करणे शक्य झाले. 

मला पहिल्यापासूनच शेतीकाम, अंगमेहनत आणि सायकल चालवण्याची आवड होती. मी आजही सकाळ संध्याकाळ पायी चालत असतो. माझा कोरोनाचा रिपोर्ट पाॅझिटिव्ह आल्यानंतर थोडे दडपण आले होते. परंतु सकारात्मक विचाराने माझे मनोधैर्य वाढले आणि डाॅक्टरांच्या उपचारांना प्रतिसाद देऊ शकलो म्हणूनच आज मी पुर्णतः बरा झालो आहे. असे पिसाळ यांनी यावेळी सांगितले. 

Web Title: The 91-year-old grandfather overcame Corona with a positive thought without a remedial injection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.