बार्टीच्या योजनांसाठी ९१.५० कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:12 AM2021-09-19T04:12:47+5:302021-09-19T04:12:47+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे या संस्थेला नुकताच 91.50 कोटी निधी वितरित केला असून, निधीअभावी ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे या संस्थेला नुकताच 91.50 कोटी निधी वितरित केला असून, निधीअभावी बार्टीच्या विविध योजना बंद पडणार असल्याची बाब निराधार व तथ्यहीन आहे.
अनुसूचित जातीतील आर्थिक दुर्बल कुटुंबातील दहावीच्या परीक्षेत ९०% पेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पुढील दोन वर्ष प्रत्येकी १ लाख देणेबाबतची योजना बार्टीमार्फत सुरू केलेली असून त्याची अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू आहे. येरवडा येथे यु.पी.एस.सी. परीक्षेचे निवासी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. जिल्हा स्तरावर सामाजिक न्याय भवनात बार्टीमार्फत विविध स्पर्धा परीक्षा, बचत गट, कौशल्य विकास, उद्योजकता विकास आदी बाबींवर आधारभूत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
M.Phil /P.hd च्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारी फेलोशिपची संख्या १०६ वरून २०० केली आहे. लॉकडाऊनच्या काळात UPSC व MPSC चे ऑनलाईन प्रशिक्षण वर्ग सुरूच आहेत. सामाजिक न्याय विभागातील कर्मचाऱ्यांचे सेवाअंतर्गत प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आले. लॉकडाऊनच्या काळात प्रशिक्षण सुरू ठेवणारी बार्टी ही एकमेव संस्था आहे.