डिजिटल सातबाऱ्याचे काम ९२ टक्के पूर्ण; ७१ लाख उताऱ्यांचे काम बाकी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2019 04:04 AM2019-12-06T04:04:58+5:302019-12-06T04:05:04+5:30
राज्यात २ कोटी ८२ लाख ९२ हजार सातबारा उतारे असून, त्यापैकी २ कोटी १० लाख ४० हजार १४२ सातबारा उता-यांवर डिजिटल स्वाक्षरी झाली आहे.
पुणे : राज्यातील सातबारा उता-यांपैकी ९२ टक्के उतारे डिजिटल झाले असून, ७१ लाखांहून अधिक सातबारा उतारे डिजिटाईज होणे बाकी आहेत. या उता-यांमधील त्रुटी दूर करु हे काम पूर्ण करण्याचे आदेश तहसीलदार व प्रांताधिका-यांना दिल्याची माहिती भूमी अभिलेख विभागाने दिली.
राज्यात २ कोटी ८२ लाख ९२ हजार सातबारा उतारे असून, त्यापैकी २ कोटी १० लाख ४० हजार १४२ सातबारा उता-यांवर डिजिटल स्वाक्षरी झाली आहे. हे सातबारा उतारे आॅनलाईन उपलब्ध झाले आहेत. म्हणजेच सुमारे ९२ टक्के सातबारा डिजिटल झाले आहेत. उरलेल्या आठ टक्के उताºयांमधे काही ना काही त्रुटी राहिल्या आहेत. त्या दूर करण्यासाठी संबंधित तालुक्यातील तहसीलदारांना जमीन महसूल कायदा कलम १५५ अन्वये आदेश दिले आहेत. तसेच सातबारा उताºयामधील त्रुटी योग्य प्रकारे दूर होत आहेत की नाही, याची पाहणी करण्याची जबाबदारी प्रांताधिकाºयांवर सोपविली आहे. हलगर्जी करणाºया कर्मचाºयांवर कारवाई करण्यात येणार आहे.
उताºयातील त्रुटी दोन महिन्यांत दूर करण्याबाबत राज्याचे अवर
सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी दिले आहेत. याबाबत मागील काही दिवसांपूर्वी श्रीवास्तव यांनी व्हिडिओ कॉन्सरन्सद्वारे महसूल विभागातील अधिका-यांची बैठक घेतली होती. या बैठकीत त्रुटी राहिलेल्या सातबारा उताºयांवर चर्चा केली होती. त्या नंतरच तहसिलदार आणि प्रांत अधिकाºयांना त्रुटी दूर करण्याचे आदेश दिले आहेत.