आंबेगाव तालुक्याच्या डिंभे धरणात ९३ टक्के पाणीसाठा; धरण भरण्याच्या मार्गावर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 12:57 PM2023-08-28T12:57:11+5:302023-08-28T12:57:28+5:30
यंदा धरण पाणलोट क्षेत्रात केवळ ४०८ मि.मी. एवढा एकुण पाऊस झाला असून मागील वर्षी ९९८ मि. मी. एवढा पाऊस झाला होता
डिंभे : डिंभे धरणात आजच्या तारखेला ९३ टक्के एवढा पाणी साठा झाला आहे. धरण भरण्याच्या मार्गावर असले तरी मागील वर्षाच्या तुलनेत यंदा धरणात संथ गतीने पाणी जमा होत आहे. पावसाचे प्रमाणही मागील वर्षाच्या तुलनेत जवळ पास निम्म्याने कमी आहे. मागील वर्षी याच तारखेला धरण ९७ टक्के भरले होते. यंदा धरण पाणलोट क्षेत्रात केवळ ४०८ मि.मी. एवढा एकुण पाऊस झाला असून मागील वर्षी ९९८ मि. मी. एवढा पाऊस झाला होता. धरणातून सध्या विजगृहाद्वारे ६८० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरणात सध्या ९३ टक्के एवढा पाणीसाठा झाला आहे. कुकडी प्रकल्पातील हे महत्त्वाचे धरण मानले जाते. पुणे जिल्ह्यासह नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे या धरणातील पाणी साठ्याकडे लक्ष लागून राहिले आसते. पूर्व भागातील हजारो हेक्टर क्षेत्र डिंभे धरणाच्या पाण्यामुळे सिंचनाखाली आले आहे. धरण पाणलोट क्षेत्रात मागील वर्षाच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण जवळपास निम्म्याने कमी राहिले असून गेल्या वर्षी या तारखेला हे धरण शंभर टक्के भरलेले होते. धरण यंदा कसेबसे ९३ टक्क्यापर्यंत आले आहे. मागील वर्षी आजच्या तारखेपर्यंत या भागात जवळपास १००० मिलिमीटर पाऊस झाला होता. यंदा केवळ ४०८ मीमी एवढाच पाऊस झाला आहे.