खडकवासला धरण साखळीत ९३ टक्के पाणीसाठा; गेल्या वर्षीपेक्षा यंदा ७ टक्के कमी पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 10:20 AM2023-08-28T10:20:22+5:302023-08-28T10:20:35+5:30

दोन आठवड्यात टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाला

93 percent water storage in Khadakwasla dam chain 7 percent less water storage this year than last year | खडकवासला धरण साखळीत ९३ टक्के पाणीसाठा; गेल्या वर्षीपेक्षा यंदा ७ टक्के कमी पाणीसाठा

खडकवासला धरण साखळीत ९३ टक्के पाणीसाठा; गेल्या वर्षीपेक्षा यंदा ७ टक्के कमी पाणीसाठा

googlenewsNext

पुणे : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील चारही धरणांत आतापर्यंत २७.१६ टीएमसी म्हणजे ९३.१७ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा २ टीएमसीने म्हणजे ७ टक्के पाणीसाठा कमी आहे.

राज्यात जून महिन्यात पावसाने चांगलीच ओढ दिली होती. मात्र, जुलै महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यांत पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाला. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिली आहे. गेल्यावर्षी याच दिवशी धरणे १०० टक्के भरली होती. रविवारी २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत या चारही धरणांत २७. १६टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा २ टीएमसीने म्हणजे ७ टक्के पाणीसाठा कमी आहे.


धरण                        टीएमसी                            टक्के
खडकवासला -            १.०७                              ५४.३९
पानशेत -                 १०. ६५                               १००
वरसगाव -                १२.५६                              ९७.९७
टेमघर -                     २.८८                              ७७ .५८

एकूण -                   २७.१५                               ९३. १७

Web Title: 93 percent water storage in Khadakwasla dam chain 7 percent less water storage this year than last year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.