गोडावूनमधून ९४ स्मार्टफोन लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 03:13 AM2017-08-04T03:13:50+5:302017-08-04T03:13:50+5:30

गोदामाच्या छताचा पत्रा उचकटून सॅमसंग कंपनीचे १७ लाख ४२ हजार किमतीचे ९४ स्मार्टफोन चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना साई सत्यम गोदाम परिसरात स्टोरवेल गोडावूनमध्ये मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली.

 94 Smartphone Lapsas from Godavari | गोडावूनमधून ९४ स्मार्टफोन लंपास

गोडावूनमधून ९४ स्मार्टफोन लंपास

Next

वाघोली : गोदामाच्या छताचा पत्रा उचकटून सॅमसंग कंपनीचे १७ लाख ४२ हजार किमतीचे ९४ स्मार्टफोन चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना साई सत्यम गोदाम परिसरात स्टोरवेल गोडावूनमध्ये मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. याच परिसरात नोव्हेंबर २०१६मध्ये चोरट्यासोबत झालेल्या झटापटीत सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला होता.
यातील चोरट्यांचा अजूनही तपास लावण्यात यश आले नसताना ९४ मोबाईल चोरीला गेल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. गोदामाचे सुपरवायझर अभिजित नरेंद्र धानोरकर (रा. वडगावशेरी) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोली गावाच्या हद्दीमध्ये साई सत्यम गोदाम परिसरात सुनीता साडी सेंटरच्या पाठीमागे सॅमसंग मोबाईल कंपनीचे स्टोरवेल गोदाम आहे.
मंगळवारी रात्री चोरट्यांनी गोदामाच्या छताचा पत्रा उचकटून गोडावूनमधील सॅमसंग कंपनीचे एस ८, प्राईम, टॅबलेट व इतर असे एकूण ९४ स्मार्टफोन मोबाईल चोरून
नेले.
घटनेनंतर पोलिसांनी पंचनामा करून गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी लोणीकंद पोलीस तपास करीत आहेत.
पोलिसांसमोर आव्हान
याच गोदाम परिसरामध्ये नोव्हेंबर २०१६ मध्ये सुरक्षारक्षकाला मिठाईतून गुंगीचे औषध देऊन चोरी करण्याचा प्रयत्न झाला होता. या वेळी चोरट्यासोबत झालेल्या झटापटीत शिवाजी काजळे या सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला होता. तर मार्च २०१७ मध्ये सहकाºयाच्या वादातून कृष्णा जाधव याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती.
काजळे याच्यावर गोळी झाडणाºया चोरट्यांचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले नसताना याच परिसरात गोदामामध्ये १७ लाखांचे मोबाईल चोरीला गेल्याने पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. याच परिसरात किरकोळ चोरीच्या घटना वारंवार घडत असल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत. यामुळे या ठिकाणी पेट्रोलिंग वाढवावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
चोरीच्या घटनेच्या तपासात धागेदोरे हाती लागले आहेत. लवकरच चोरटे पोलिसांच्या ताब्यात असतील. - सर्जेराव पाटील, पोलीस निरीक्षक

Web Title:  94 Smartphone Lapsas from Godavari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.