अहो आश्चर्यम! पिंपरी चिंचवडमध्ये सारख्याच चेहऱ्याचे ९४ हजार मतदार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 11:54 AM2022-12-19T11:54:27+5:302022-12-19T11:54:41+5:30

सुमारे ९४ हजार मतदार एकाच चेहऱ्याचे असल्याची माहिती उघड...

94 thousand voters with the same face in Pimpri Chinchwad | अहो आश्चर्यम! पिंपरी चिंचवडमध्ये सारख्याच चेहऱ्याचे ९४ हजार मतदार

अहो आश्चर्यम! पिंपरी चिंचवडमध्ये सारख्याच चेहऱ्याचे ९४ हजार मतदार

googlenewsNext

पिंपरी : केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे छायाचित्र मतदार यादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये मतदारांच्या नवीन नोंदणीसह मतदार यादीतील तपशीलात दुरुस्तींचाही समावेश केला आहे. पिंपरी चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात सुमारे ९४ हजार मतदार एकाच चेहऱ्याचे असल्याची माहिती उघड झाली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक तयारी सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाच्या वतीने निरंतर मतदार नोंदणी सुरू असते. त्यासोबतच मतदार याद्या दुरुस्ती केली जाते. एकाच मतदारांची नावे ही वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघात असल्याचेही आढळून येते. अशा मतदारांचा शोध घेण्याची मोहीम निवडणूक विभागामार्फत राबविली जात असून, पिंपरी चिंचवड शहरासह पुणे जिल्ह्यात असे तब्बल ४ लाख ६७ हजार ४१९ जण आढळले आहेत.

दुरुस्ती अभियान

एकाच चेहऱ्याचे छायाचित्र असलेली, एकसारखी नावे असलेल्या व्यक्तींच्या संबंधित पत्त्यावर खातरजमा केली जाणार असून, एकसारखी व्यक्ती असेल तर एकच नाव मतदार यादीत ठेवले जाणार आहे.

एकाच चेहऱ्याचे जिल्ह्यात ४ लाख मतदार

एकाच चेहऱ्याचे मतदार शोधण्यासाठी सॉफ्टवेअरची मदत घेतली जाते. पुणे जिल्ह्यात असे ४ लाख ६७ हजार ४१९ जण आढळले आहेत. सर्वाधिक एकाच चेहऱ्याचे मतदार हडपसर मतदारसंघात ५० हजार ३०४ मतदार आहेत. तर सर्वात कमी मतदार जुन्नर मतदारसंघात ८७७५ इतके आहेत.

व्यक्तीचे दोन कार्ड, एक रद्द होणार

एका मतदाराचे नाव एकाच मतदारसंघात असावे, यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामुळे एका व्यक्तीचे एकापेक्षा अधिक मतदारसंघात नाव असल्यास एकच नाव ठेवण्यात येणार आहे.

विधानसभा मतदारसंघनिहाय सारख्या चेहऱ्यांचे मतदार

मावळ १३,१०८

चिंचवड ३६,७७३

पिंपरी २१,८१९

भोसरी ३७,३७०

जुन्नर ८,७७५

आंबेगाव ९,४८५

खेड आळंदी १३,०८९

शिरूर २१,३८०

इंदापूर ८,८०७

बारामती १०,१२१

पुरंदर ३३,३४९

भोर २४,८७८

वडगाव शेरी २९,०८९

शिवाजीनगर १५,५०७

कोथरुड २८,२२७

खडकवासला ४५,६५३

पर्वती १७ं,५२६

हडपसर ५०,३०४

पुणे कॅन्टोमेंट १२,१८७

कसबापेठ १३,००२

एकूण -४,६७,४१९

निरंतर मतदार नोंदणी मोहीम सुरु आहे. नागरिकांनी त्यांचे नाव एकापेक्षा अधिक ठिकाणच्या मतदार यादीत समाविष्ट असल्यास ऑनलाइन अर्ज क्र. ७ भरून किंवा नजीकच्या मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज भरून आपले नाव मतदार यादीतून वगळावे व मतदार यादीचे शुद्धीकरण करण्यासाठी निवडणूक प्रशासनास सहकार्य करावे.

- स्मिता झगडे, उपायुक्त, पिंपरी चिंचवड

Web Title: 94 thousand voters with the same face in Pimpri Chinchwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.