खेड तालुक्यात सोमवारी ९६ रुग्णांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:12 AM2021-03-23T04:12:01+5:302021-03-23T04:12:01+5:30
खेड तालुक्यातील एकूण रुग्णांचा आकडा १२ हजार २०३ झाला आहे. यापैकी ११ हजार ४३१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ...
खेड तालुक्यातील एकूण रुग्णांचा आकडा १२ हजार २०३ झाला आहे. यापैकी ११ हजार ४३१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सोमवारी दिवसभरात ३६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर सद्यस्थितीत ५६५ सक्रिय रुग्ण आहेत. खेड तालुक्यात एकूण मृतांचा आकडा आजपर्यंत २०७ एवढा आहे. सोमवारी सायंकाळी पाचपर्यंत मिळालेल्या रुग्णांपैकी तालुक्याच्या ग्रामीण भागात ५९ रुग्ण, चाकण २०, आळंदी ६, राजगुरुनगर ११ असे एकूण ९६ नवे रुग्ण मिळाल्याची माहिती खेड तालुका आरोग्य प्रशासनाने दिली.
यापैकी दोंदे १, सायगाव २, आंबेठाण १, गडद १, कडाचीवाडी ६, खराबवाडी ४, कुरुळी १, मेदनकरवाडी ८, महाळुंगे २, नाणेकरवाडी १०, निघोजे १, वाकी खुर्द ३, येलवाडी २, कुरकुंडी १, होलेवाडी २, सातकरस्थळ १, शिरोली १, वाकी बुद्रुक ३, भोसे १, चऱ्होली खुर्द १, धानोरे २, मरकळ १, रासे १, शेलपिंपळगाव १, वडगाव - घेनंद १, गुळाणी १ असे ग्रामीण भागात रुग्ण मिळून आले आहेत.