अकरावीसाठी ९६ हजार ३२० जागा, पुणे व पिंपरी-चिंचवडमधील २८५ महाविद्यालये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 04:07 AM2018-06-15T04:07:04+5:302018-06-15T04:07:04+5:30
अकरावी प्रवेशासाठीची यादी अखेर गुरुवारी सायंकाळी केंद्रीय प्रवेश समितीच्या वतीने जाहीर करण्यात आली. यंदाच्या वर्षी अकरावीसाठी पुणे व पिंपरी- चिंचवडमधील २८५ महाविद्यालयांमधून ९६ हजार ३२० जागा उपलब्ध असून, मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाच हजारांनी विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.
पुणे - अकरावी प्रवेशासाठीची यादी अखेर गुरुवारी सायंकाळी केंद्रीय प्रवेश समितीच्या वतीने जाहीर करण्यात आली. यंदाच्या वर्षी अकरावीसाठी पुणे व पिंपरी- चिंचवडमधील २८५ महाविद्यालयांमधून ९६ हजार ३२० जागा उपलब्ध असून, मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाच हजारांनी विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. मागील वर्षी ९१ हजार ६७० जागा उपलब्ध होत्या. अकरावी प्रवेशासाठी बाहेरगावांहून आलेल्या विद्यार्थ्यांना जर प्रवेश घ्यायचा असेल, तर त्यांनी नेमके काय करावे, कोणत्या मार्गदर्शन केंद्रांना भेट द्यावी, माहितीपुस्तिका कुठून घ्यावी, याची माहितीच जाहीर न केल्याने विद्यार्थी संभ्रमात होते.
यंदाच्या वर्षापासून अकरावी समितीने कला व सांस्कृतिक कोट्याअंतर्गत दिले जाणारे आरक्षण रद्द केले आहे. विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेतच हे वाढीव गुण मिळत असल्याने समितीने हा निर्णय घेतला आहे. अकरावी समितीसाठी व महाविद्यालयांसाठी दर वर्षी अकरावीसाठी प्रवेशप्रक्रिया सारखीच असली, तरीही विद्यार्थ्यांसाठी मात्र ती दर वर्षी नवी असते. त्यामुळेच विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक महाविद्यालयाने त्यांच्यासाठी हेल्पडेस्क सुरू करावेत अशा सूचना अकरावी केंद्रीय समितीने केल्या आहेत. हे हेल्पडेस्क सोमवार ते शनिवार सकाळी दहा ते सायंकाळी पाचपर्यंत सुरूठेवावे, असेही सांगण्यात आले आहे.
अनेक महाविद्यालये विद्यार्थ्यांचे पूर्ण शुल्क घेऊन प्रवेश निश्चित करताना विद्यार्थ्यांकडून डीडी स्वरूपात शुल्क भरण्याची मागणी करतात. त्यामुळे पालकांना नाहक त्रास होतो. त्यामुळेच विद्यार्थ्यांचे शुल्क हे आॅनलाइन पद्धतीने किंवा तात्पुरत्या स्वरूपात निश्चित करून; मग पूर्ण शुल्क भरायला सांगावे. जेणेकरून पालकांना नाहक त्रास
सहन करावा लागणार नाही, अशाही सूचना समितीने महाविद्यालयांना दिल्या आहेत.
त्या अनुदानित महाविद्यालयांविरुद्ध संघटनेकडे तक्रार करा
अकरावी केंद्रीय प्रवेश समितीने प्रत्येक विनाअनुदानित महाविद्यालयाने किती शुल्क घ्यावे किंवा त्या महाविद्यालयचे शुल्क किती आहे, हे माहितीपुस्तिकेत सांगितले आहे; मात्र अनुदानित महाविद्यालयांबाबत कोणतीही ठोस माहिती नाही.
शासनाच्या नियमानुसार प्रत्येक अनुदानित महाविद्यालयाने ३३० ते ३९० रुपये शुल्क घेणे अपेक्षित आहे. पुण्यातील अनुदानित महाविद्यालयांनी ३६० रुपये शुल्क घेणे अपेक्षित आहे.
जी महाविद्यालये यापेक्षा जास्त शुल्क आकारतील त्यांच्याविरोधात आमच्या संघटनेकडे तक्रार करा,
अशी भूमिका आता सिस्कॉम या संघटनेने घेतली आहे. त्यासाठी सिस्कॉम,
निर्मल इंटरप्राइजेस, शॉप नं २, श्रीअनिकेत अपार्टमेंट, २९२ कसबा पेठ, पुणे ४११०११ यांच्याकडे
तक्रार करावी, असे आवाहन संघटनेच्या संचालिका
वैशाली बाफना यांनी
केले आहे. दरम्यान, याबाबत पालक व विद्यार्थ्यांना
शिक्षण विभागाकडेही दाद मागता येईल.
अकरावीसाठी उपलब्ध
शाखानिहाय जागांची संख्या
शाखा शाखा संख्या प्रवेश क्षमता
कला (मराठी) ७० ८०६०
कला (इंग्रजी) ६१ ५९४०
वाणिज्य (मराठी) ९७ १३१००
वाणिज्य (इंग्रजी) १६६ २५५६०
विज्ञान (इंग्रजी) २२५ ३९०९०
व्यावसायिक शिक्षण (मराठी) २७ ३०४०
व्यावसायिक शिक्षण (इंग्रजी) १७ ४५७०
एकूण जागा ९६, ३२०
प्रवेशासाठीचे संकेतस्थळ