पुरंदर तालुक्यात आढळले ९७ कोरोनाबाधित रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:11 AM2021-05-21T04:11:23+5:302021-05-21T04:11:23+5:30

सासवड येथील शासकीय रुग्णालयात मंगळवार (दि.१८) १०० संशयित रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी घेण्यात आली होती. त्यांचे प्रलंबित अहवाल गुरुवारी ...

97 coronavirus patients found in Purandar taluka | पुरंदर तालुक्यात आढळले ९७ कोरोनाबाधित रुग्ण

पुरंदर तालुक्यात आढळले ९७ कोरोनाबाधित रुग्ण

Next

सासवड येथील शासकीय रुग्णालयात मंगळवार (दि.१८) १०० संशयित रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी घेण्यात आली होती. त्यांचे प्रलंबित अहवाल गुरुवारी प्राप्त झाले असून, यापैकी २३ रुग्णांचे अहवाल बाधित आले. सासवड १७, पिंपळे २, कुंभारवळण, माळशिरस, उदाचीवाडी, वीर प्रत्येकी एक रुग्णांचा अहवाल बाधित आला आहे.

सासवड येथील शासकीय रुग्णालयात गुरुवार (दि.२०) ५३ संशयीत रुग्णांची अँटिजन चाचणी घेण्यात आली होती. यापैकी ८ रुग्णांचे अहवाल बाधित आले.

सासवड ४, कोथळे, सुपा, पारगाव, दिवे येथील प्रत्येकी एक रुग्णांचा अहवाल बाधित आला आहे.

जेजुरी येथील ग्रामीण रुग्णालयात गुरुवार (दि.२०) ४५ संशयित रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी घेण्यात आली. यापैकी १५ रूग्णांचे अहवाल बाधित आले.

जेजुरी ६, सासवड, तक्रारवाडी २, मांडकी, पिसर्वे, नाझरे प्रत्येकी १, तालुक्याबाहेरील मुर्टी २.

जेजुरी येथील ग्रामीण रुगणालयात ६८ संशयीत रुग्णांची अँटिजन चाचणी तपासण्यात आली. यापैकी २८ रूग्णांचे अहवाल बाधित आले. सासवड ६, मांडकी ३, जेजुरी, रानमळा, सुपे सासवड, बेलसर, पिंपळे येथील प्रत्येकी २, जेऊर, पिसे, हिवरे, राख, पांगारे, तक्रारवाडी, नीरा, टेकवडी, कुंभारकरवाडी प्रत्येकी १.

ग्रामीण कार्यक्षेत्रात 'माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत' नीरा, परिंचे, माळशिरस, वाल्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात संशयित रुग्णांची अँटिजन चाचणी तपासण्यात आली.

नीरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात २३ संशयित रुग्णांचे तपासणी करण्यात आली. यापैकी ९ रुग्णांचे अहवाल बाधित आले.

नीरा ७, पिंपरे बु.२. परिंचे प्राथमिक आरोग्य केंद्रात २३ संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. यापैकी ५ रुग्णांचे अहवाल बाधित आले. वीर, यादववाडी, भिवडी, हिवरे प्रत्येकी १, तालुक्याबाहेरील भांबवडे १.

माळशिरस प्राथमिक आरोग्य केंद्रात ५ संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. यापैकी ४ रुग्णांचे अहवाल बाधित आले. आंबळे ३, नायगाव १.

वाल्हे प्राथमिक आरोग्य केंद्रात १७ संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. यापैकी ५ रुग्णांचे अहवाल बाधित आले. जेऊर ४, हरणी १ रुग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले आहेत.

Web Title: 97 coronavirus patients found in Purandar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.