सेट परीक्षेसाठी ९८ हजार अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:07 AM2021-07-04T04:07:56+5:302021-07-04T04:07:56+5:30
पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यातील उमेदवारांची सेट परीक्षा घेतली जाते. उमेदवारांना परीक्षेसाठी दोन्ही राज्यातील प्रमुख शहरांमध्ये ...
पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यातील उमेदवारांची सेट परीक्षा घेतली जाते. उमेदवारांना परीक्षेसाठी दोन्ही राज्यातील प्रमुख शहरांमध्ये परीक्षा केंद्र उपलब्ध करून दिले जातात. या वर्षी सेट परीक्षा येत्या २६ सप्टेंबर रोजी घेण्याचे नियोजन आहे. विद्यापीठाच्या सेट विभागाने उमेदवारांना परीक्षा अर्ज भरण्यासाठी १७ मे १० जूनपर्यंत मुदत दिली होती. त्यानंतर ११ ते १७ जून आणि १८ ते २५ जून अशी दोनवेळा मुदतवाढ देण्यात आली. तसेच उमेदवारांना २६ ते ३० जून या कालावधीत अर्जात दुरुस्तीची संधी दरम्यान आली होती. विद्यापीठाच्या सेट विभागाकडे एकूण ९८ हजार २८ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत, असे सेट विभागाचे समन्वयक डॉ. बी. पी. कापडणीस यांनी सांगितले.
कापडणीस म्हणाले, सेट विभागाकडे अर्ज केलेल्या उमेदवारांची अद्ययावत यादी पुढील आठवड्यात प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यात आपले नाव असल्याची प्रत्येकाने खात्री करावी. शुल्क भरले, पण नाव दिसत नाही. काही महिन्यांपासून सेट परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याची चर्चा केली जात आहे. मात्र, सप्टेंबर महिन्यात होणारी सेट परीक्षा पूर्वीप्रमाणे ऑफलाइन पद्धतीनेच होणार आहे.
-----------------------------