देहविक्रय करणाऱ्या ९९ टक्के महिला शोधताहेत उपजीविकेसाठी पर्यायी स्त्रोत; ८५ टक्के महिला कर्जबाजारी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 11:22 AM2020-09-16T11:22:31+5:302020-09-16T11:39:38+5:30

बुधवार पेठ हे भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे 'रेड-लाइट' क्षेत्र आहे...

99% of prostitutes are looking for alternative sources of livelihood | देहविक्रय करणाऱ्या ९९ टक्के महिला शोधताहेत उपजीविकेसाठी पर्यायी स्त्रोत; ८५ टक्के महिला कर्जबाजारी

देहविक्रय करणाऱ्या ९९ टक्के महिला शोधताहेत उपजीविकेसाठी पर्यायी स्त्रोत; ८५ टक्के महिला कर्जबाजारी

googlenewsNext
ठळक मुद्देदेहविक्रय करणाऱ्या महिलांच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या संस्थेअहवालातूनही बाब समोर ८५ टक्के महिला कर्जबाजारी; उत्पन्न घटले

पुणे : कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यात देहविक्रय करणाऱ्या महिला देखील भरडल्या गेल्या आहेत. ८५ टक्के महिलांनी मालक, व्यवस्थापक आणि सावकारांकडून कर्ज घेतले आहे. मात्र आता कामाअभावी ते फेडायचे कसे असा प्रश्न देहविक्रय करणाऱ्या महिलांना पडला आहे.त्यामुळे बुधवार पेठ भागातील ९९ टक्के महिला उपजीविकेसाठी पर्यायी स्त्रोतांचा शोध घेत आहेत. आशा केअर ट्रस्ट या देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या संस्थेने केलेल्या पाहणी अहवालातूनही बाब समोर आली आहे.
          बुधवार पेठ हे भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे  रेड-लाइट क्षेत्र आहे.ज्यामध्ये जवळजवळ ७०० वेश्यालय आणि जवळजवळ ३,००० व्यावसायिक महिला कामगार आहेत. या अहवालासाठी या भागातील ३०० (सुमारे १० %) महिलांचा अभ्यास करण्यात आला.  ८७%  महिलांनी सांगितले की साथीचा रोग सर्वत्रयेण्यापूर्वीच त्यांचे उत्पन्न स्वत:सह आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी पुरेसे नव्हते. शिक्षणाची कमतरता आणि रोजगाराच्या कौशल्यांचा अभाव यामुळे उत्पन्नाच्या एका स्त्रोतावरच त्यांना अवलंबून राहाणे भागपडले. बहुतेक महिलांना आता रोजीरोटीचे पर्यायी स्त्रोत शोधायचे आहेत आणित्यांना या व्यवसायापासून दूर जायचे आहे. त्यांच्या दुर्दशाची सखोल माहिती घेऊन, अहवालात देहविक्री करणाऱ्या महिलांच्या अनेक सामाजिक-आर्थिकघटकांचा शोध घेण्यात आला.

यामध्ये ८२ % महिला २५ ते ४५ वर्षे वयोगटातील आहेत. त्यापैकी काही जण अल्पवयीन होत्या, त्यांना सक्तीने देहविक्री करण्यास भाग पाडण्यात आले. ८४ % हून अधिक महिलांचे कोणतेही औपचारिक शिक्षण झाले नाही आणि उर्वरित १६ टक्के महिला माध्यमिक शिक्षण संपण्यापूर्वीच या व्यवसायात आणल्या गेल्या. ९२% महिलांना पुन्हा काम सुरू करण्याची भीती आहे पण उपासमारीच्या भीतीने त्या पंगु झाल्या आहेत. व्यवस्थापकांकडून होणाऱ्या छळामुळे न त्यांना दररोजच्या ब्रेड आणि बटरची चिंता करायला भाग पाडले आहे. ६८% महिलांचा असा विश्वास आहे की येत्या काळात हा व्यवसाय वाढू शकतो. परंतु उर्वरित महिलांना संधी मिळाल्यास पर्यायी रोजगार स्वीकारण्याची इच्छा आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------
अहवालात सुचविण्यात आलेल्या बाबी
जिल्हा व राज्य प्रशासन राष्ट्रीय शहरी आजीविका मिशन अंतर्गत महिलांसाठी टेलरिंग, डाटा एन्ट्री, टेलिकॅलिंग, विक्री व विपणन, पॅकेजिंग, उद्योजकताआदी कौशल्यावर आधारित मूलभूत प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे शक्य असल्याचेअहवालात सुचविण्यात आले आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------
कोव्हिडच्या साथीने या महिलांकरिता पुनर्वसन करण्याची यंत्रणा तयार करण्याची संधी दिली आहे.महिलांना, कर्ज फेडण्यासाठी आणि नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी मदत म्हणून तस्करीग्रस्त पीडित मदत निधी द्यावा. आशा केअर  ट्रस्टच्या नेतृत्त्वाखाली महापौर मुरलीधर मोहोळ यांना स्वयंसेवी
संस्थांच्या प्रतिनिधींचे एक शिष्टमंडळ भेटले. त्यांना अहवाल सादर करण्यात आला आहे. अभ्यासाच्या निष्कर्षांना समर्थन देण्यासाठी त्वरित कारवाई करण्याची विनंती  शिष्टमंडळाने केली आहे

- शैला शेट्टी, अध्यक्षा, आशा केअर ट्रस्ट
----------------------------------------------------------------------------------------------------------
गेल्या सहा महिन्यांपासून खूप त्रास सहन करावा लागत आहे.  कमाईचा दिवस आणि बचत नसल्यामुळे आम्हाला जगणे कठीण जात आहे. आजवर उपजीविकेचे इतरकोणतेही साधन नसल्यामुळे व्यवसाय सुरू ठेवणे भाग पडले. परंतु कोव्हिडमुळेसंधी मिळाल्यामुळे मी पर्यायी रोजीरोटीची निवड करू इच्छित आहे जेणेकरूनउत्पन्नाचा वेगळा स्त्रोत निर्माण होऊ शकेल- देहविक्रय करणारी एक महिला
---------------------------------------------------------------------------------------------------------------------

Web Title: 99% of prostitutes are looking for alternative sources of livelihood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.