नववा आंतरराष्ट्रीय महिला चित्रपट महोत्सव ९ मार्चपासून रंगणार  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 07:28 PM2018-03-05T19:28:45+5:302018-03-05T19:28:45+5:30

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात येणारा महिला चित्रपट महोत्सव यंदा येत्या शुक्रवारी दि.९ ते ११ मार्च दरम्यान राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे रंगणार आहे. या महोत्सवाचे यंदा नववे वर्ष आहे. 

The 9th International Women Film Festival will start from 9th March | नववा आंतरराष्ट्रीय महिला चित्रपट महोत्सव ९ मार्चपासून रंगणार  

नववा आंतरराष्ट्रीय महिला चित्रपट महोत्सव ९ मार्चपासून रंगणार  

googlenewsNext
ठळक मुद्दे कमल हसन आणि श्रीदेवी यांच्या समर्थ अभिनयाने नटलेला ' मुंदरम पिराई' हा तामिळ भाषेतील चित्रपट सायंकाळी पाहायला मिळणार आहे.इट प्रे लव्ह’ या रॅन मर्फी यांनी दिग्दर्शित केलेल्या इंग्रजी चित्रपटाने महोत्सवाचा समारोप होईल.

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी 'मुंदरम पिराई' तामिळ चित्रपटाचे सादरीकरण
पुणे : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात येणारा महिला चित्रपट महोत्सव यंदा येत्या शुक्रवार दि.९ ते ११ मार्च दरम्यान राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे रंगणार आहे. महिला पत्रकारांचा आयाम गट, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय आणि आशय फिल्म क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे यंदाचे हे नववे वर्ष आहे. 
' देशविदेशात भ्रमंती करणा-या प्रवासी महिला' ही यंदाच्या महोत्सवाची संकल्पना असून, त्यावर आधारित चित्रपट महोत्सवात सादर करण्यात येणार असल्याची माहिती आयाम ग्रुपच्या मनस्विनी प्रभुणे आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आशय फिल्म क्लबचे सतीश जकातदार आदी उपस्थित होते. 
या महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी दि.९ मार्च रोजी दुपारी ४.३० वाजता या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. देशविदेशात भ्रमंती करून अनुभवावर प्रवासी ब्लॉग लिहिणा-या रितू हरीश गोयल यांना यावर्षीचा 'आयाम महिला पत्रकार' या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. उद्घाटन सोहळ्यातच या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. उद्घाटन सोहळ्यानंतर सिडने पोलॅक दिग्दर्शित  'आऊट आॅफ आफ्रिका' हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. प्रख्यात अभिनेत्री मेरिल स्ट्रीप ची यात प्रमुख भूमिका आहे.
शनिवारी दि. १० मार्च रोजी सकाळी १० वाजता सॅम मेंडेज दिग्दर्शित  ‘अवे वुई गो' या चित्रपटानंतर या महोत्सवात अंडरे वेल्स यांनी दिग्दर्शित केलेला 'अंडर द टस्कन सन' आणि मार्टिन प्रक्कट दिग्दर्शित ' चार्ली' हा मल्याळम भाषेतील चित्रपट पाहण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. 
प्रादेशिक भाषांमधील अनेक चित्रपटांमधून अभिनय आणि सौंदर्याच्या बळावर रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणा-या श्रीदेवी यांनाही महोत्सवात श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे. कमल हसन आणि श्रीदेवी यांच्या समर्थ अभिनयाने नटलेला ' मुंदरम पिराई' हा तामिळ भाषेतील चित्रपट सायंकाळी पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या दिवशी रविवारी ११ मार्च रोजी सकाळी १० वाजता इमेन्यूल बरकॉट दिग्दर्शित' आॅन माय वे' हा फ्रेंच चित्रपट, जीन मार्क व्हॅली  दिग्दर्शित ‘वाईल्ड'  हा चित्रपट पाहता येणार आहे. या चित्रपटासाठी अभिनेत्री रिव्ह विदर स्पून हिला अकादमी पुरस्कार मिळाला आहे. याच दिवशी टायफूर आयदीन दिग्दर्शित' ब्लॅक क्रो' हा तुर्कीश भाषेतील चित्रपट दाखविला जाणार आहे. ‘इट प्रे लव्ह’ या रॅन मर्फी यांनी दिग्दर्शित केलेल्या इंग्रजी चित्रपटाने महोत्सवाचा समारोप होईल. त्यापूर्वी झेलम चौबळ, शुभदा जोशी,डॉ.अमिता कुलकर्णी,वासंती घैसास आदी महिला आपल्या प्रवासी अनुभवावर उपस्थितांशी संवाद साधणार आहे. 
संकल्पना, विषय आणि चित्रपट मांडणी याला अनुसरून देशविदेशातील व प्रादेशिक भाषांतील काही गाजलेल्या चित्रपटांची प्रातिनिधिक निवड या महोत्सवासाठी करण्यात आली आहे. सर्व चित्रपटांना इंग्रजीत सबटायटल्स असून, हा महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य आहे. 

Web Title: The 9th International Women Film Festival will start from 9th March

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.