Pune Crime: पुण्यात १० वर्षीय दिव्यांग मुलीचे लैंगिक शोषण, मारहाण करून धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 14:03 IST2024-04-02T14:02:28+5:302024-04-02T14:03:00+5:30
याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात बलात्काराचा, मारहाणीचा आणि बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

Pune Crime: पुण्यात १० वर्षीय दिव्यांग मुलीचे लैंगिक शोषण, मारहाण करून धमकी
पुणे : दहा वर्षांच्या दिव्यांग मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी अविनाश (रा. समर्थनगर, हिंगणे खुर्द, सिंहगड रोड) याला अटक केली आहे.
अधिक माहितीनुसार पीडित मुलीच्या आईने रविवारी (दि. ३१) सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडित मुलगी दहा वर्षांची असून दिव्यांग आहे. ३१ मार्च रोजी मुलगी तिच्या घराजवळ असताना आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
तसेच, तिला मारहाण केली. यावेळी मुलीच्या भावाने आरडाओरडा केल्यानंतर आरोपी पळून तेथून गेला. त्यानंतर आरोपी परत तेथे आला आणि तिला शिवीगाळ करून कोणाला सांगू नको म्हणत तिला पुन्हा मारहाण करून पळून गेला. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात बलात्काराचा, मारहाणीचा आणि बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.