Pune: बारा वर्षांच्या मुलीच्या पोटात दुखू लागल्याने दवाखान्यात नेले; तपासणीनंतर धक्कादायक प्रकार उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2023 02:00 PM2023-07-29T14:00:08+5:302023-07-29T14:10:11+5:30
पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली...
पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचे गुन्हे वारंवार समोर येताना दिसत आहेत. आता अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका बारा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला पोटात अचानक दुखू लागल्याने ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पण तपासणीनंतर डॉक्टरांना धक्काच बसला. कारण बारा वर्षाची ही अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली होती. हा संपूर्ण प्रकार लक्षात आल्यानंतर डॉक्टरांनी याची माहिती पोलिसांना दिली.
त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली. तपासनंतर धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एका तरुणाने रिक्षात बसवून दोन ते तीन वेळेस तिच्यासोबत शरीर संबंध ठेवले होते. अविनाश परडे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित मुलीच्या आईने या प्रकरणी तक्रार दिली आहे. एप्रिल 2023 मध्ये हा संपूर्ण प्रकार घडला. या प्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी तरुण हा छोटा हत्ती वाहनातून पाणी पुरवण्याचे काम करतो. यातूनच त्याची या पीडित मुलीसोबत ओळख झाली होती. ओळखीचा आणि पीडित मुलीच्या अल्पवयाचा फायदा घेऊन आरोपीने तिला स्वतःच्या गाडीत बसून भुलेश्वर या ठिकाणी नेले. या ठिकाणी असलेल्या झाडीत नेऊन आरोपीने तिच्यावर दोन ते तीन वेळा लैंगिक अत्याचार केला. लोणी काळभोर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
ओळखीचा फायदा घेऊन देवाला नेले, संधीचा फायदा घेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार, मुलगी