Pune News: काऱ्हाटीमध्ये कऱ्हा नदीपात्रात पोहत असताना वीस वर्षीय तरूणाचा बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2022 11:39 IST2022-09-26T11:38:50+5:302022-09-26T11:39:27+5:30
नदी पात्रातील बंधाऱ्यात उतरला असताना पोहताना बुडून त्याचा मृत्यू...

Pune News: काऱ्हाटीमध्ये कऱ्हा नदीपात्रात पोहत असताना वीस वर्षीय तरूणाचा बुडून मृत्यू
मोरगाव (पुणे) : काऱ्हाटी (ता. बारामती) येथील शुभम संतोष खंडागळे या वीस वर्षीय तरुणाचा कऱ्हा नदी पात्रात पोहताना बुडून मृत्यू झाला. ही घटना काल (दि. २५) रोजी घडली. आईसोबत गोधडी धुण्यासाठी शुभम नदीवर गेला होता. गोधडी धुतल्यानंतर कऱ्हा नदी पात्रातील बंधाऱ्यात उतरला असताना पोहताना बुडून त्याचा मृत्यू झाला.
सविस्तर माहिती अशी की, बारामती तालुक्यातील काऱ्हाटी येथील शुभम संतोष खंडागळे हा त्याची आई जयश्री खंडागळे यांच्यासोबत घरातील गोधडी धुण्यासाठी कऱ्हा नदीवर गेला होता. गोधडी धुतल्यानंतर तो व त्याचा मित्र नदी पात्रातील बंधाऱ्यात पोहण्यासाठी उतरले असता पोहताना त्याचा मृत्यू झाला. पोलीस भरती पुर्व ॲकडमीचे शिक्षण तो सातारा येथे घेत होता. सुट्टी असल्याने तो गावी आला होता. शुभम हा खंडागळे कुटुंबाचा एकुलता एक मुलगा असल्याने खंडागळे कुटुंबीयांवर दुख:ची शोककळा पसरली आहे.
आपल्या वडिलांच्या केरसुणी बनविण्याच्या उद्योगास तो हातभार लावत असे. काल घडलेल्या घटनास्थळी बारामती तालुका तहसीलदार विजय पाटील, मंडळ अधिकारी एन.बी.मुळे, तलाठी सुनील भुसेवाड यांनी भेट दिली.