Pune | तळेगाव दाभाडेत दुकानात घूसून २४ वर्षीय तरुणीचा विनयभंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 18:20 IST2023-01-10T18:15:03+5:302023-01-10T18:20:01+5:30
२४ वर्षीय तरुणीने तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद...

Pune | तळेगाव दाभाडेत दुकानात घूसून २४ वर्षीय तरुणीचा विनयभंग
पिंपरी : दुकानात तरुणी एकटीच असल्याचे पाहून तिच्याशी गैरवर्तन करत विनयभंग केला. तसेच या विषयी तिने घरच्यांना सांगितले तर जीव मारण्याची धमकी दिली. ही घटना सोमवारी (दि. ९) तळेगाव दाभाडे येथे घडली. याप्रकरणी २४ वर्षीय तरुणीने तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी मोहन साळवे (वय २४) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ही दुकानात असताना आरोपी तेथे आले. दुकानात इतर कोणी नसल्याचे पाहून त्याने तू कॉलेजला असल्यापासून मला आवडते, असे म्हणून गैरवर्तन केले. फिर्यादी या दुकानातून पळत जावू लागल्या तेंव्हा आरोपीने त्यांचा पाठलाग करत तू कोणाला सांगितले तर मी तुझ्या परिवाराला व तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. असे फिर्यादीत नमूद आहे.