लग्नाच्या आमिषाने कोल्हापूरातील ३४ वर्षीय महिलेवर अत्याचार, लाखो रुपयेही लुटले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 08:08 PM2024-06-12T20:08:34+5:302024-06-12T20:09:13+5:30

हा प्रकार स्वारगेट एस. टी. स्टँड परिसरात आणि शुक्रवार पेठेतील हॉटेलमध्ये २० फेब्रुवारी ते ८ मे २०२४ या कालावधीत घडला आहे...

A 34-year-old woman in Kolhapur was raped and robbed of lakhs of rupees for the lure of marriage | लग्नाच्या आमिषाने कोल्हापूरातील ३४ वर्षीय महिलेवर अत्याचार, लाखो रुपयेही लुटले

लग्नाच्या आमिषाने कोल्हापूरातील ३४ वर्षीय महिलेवर अत्याचार, लाखो रुपयेही लुटले

पुणे :कोल्हापूर येथील एका ३४ वर्षीय महिलेला लग्न करण्याचे आमिष दाखवून पुण्यातील एका व्यक्तीने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिच्याजवळील सोन्याचे दागिने व ऑनलाइन अडीच लाख रुपये घेऊन फसवणूक केली. हा प्रकार स्वारगेट एस. टी. स्टँड परिसरात आणि शुक्रवार पेठेतील हॉटेलमध्ये २० फेब्रुवारी ते ८ मे २०२४ या कालावधीत घडला आहे.

या प्रकरणी पीडित महिलेने मंगळवारी (दि. ११) स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून विनायक रमेश जाधव (रा. पुणे, पूर्ण पत्ता माहीत नाही) याच्यावर बलात्कारासह अन्य कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला मूळची कोल्हापूर येथील आहे. आरोपी महिलेच्या ओळखीचा आहे. आरोपी विनायक जाधव याने पीडित महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला विश्वासात घेऊन स्वारगेट एस. टी स्टँडवर बोलावून घेतले. त्याठिकाणी चारचाकी गाडी घ्यायची असून, त्यासाठी पैशांची गरज असल्याचे सांगितले. तसेच गाडी खरेदीसाठी महिलेकडून एक तोळे सोन्याचे दागिने घेतले. त्यानंतर त्याच्या ओळखीच्या लोकांच्या बँक खात्यावर २ लाख ४७ हजार ५०० रुपये ट्रान्सफर करून घेतले.

तुझ्यासोबत आयुष्यभर सोबत राहणार असल्याचे सांगून लग्नाचे आमिष दाखवले. महिलेला शुक्रवार पेठेतील एका हॉटेलमध्ये नेऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित महिलेने स्वारगेट पोलिसांकडे तक्रार दिली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बावचे या करत आहेत.

Web Title: A 34-year-old woman in Kolhapur was raped and robbed of lakhs of rupees for the lure of marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.