५० वर्षांचा विवाहित पुरूष, पुण्यात डेटिंग ॲपवरून २३ वर्षांच्या तरुणीला ओढलं जाळ्यात, कशी फसली... 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 12:46 PM2022-08-12T12:46:32+5:302022-08-12T12:49:10+5:30

Dating App Scam: फोन नंबर एक्स्चेंज झाला, भेटीगाठी होऊ लागल्या. ५० वर्षाच्या व्यक्तीला २३ वर्षीय मिनल डेट करू लागली.

A 50-year-old married man lured a 23-year-old girl from a dating app in Pune | ५० वर्षांचा विवाहित पुरूष, पुण्यात डेटिंग ॲपवरून २३ वर्षांच्या तरुणीला ओढलं जाळ्यात, कशी फसली... 

५० वर्षांचा विवाहित पुरूष, पुण्यात डेटिंग ॲपवरून २३ वर्षांच्या तरुणीला ओढलं जाळ्यात, कशी फसली... 

googlenewsNext

- शिवानी खोरगडे
राष्ट्रीय खेळाडू असलेली आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणारी मिनलने (काल्पनिक नाव) डेटिंग ॲप डाउनलोड केले. स्वत:च्या प्रोफाईलशी एक प्रोफाईल मॅच होतेय हे बघून मिनलनेही फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली. समोरच्याने अविवाहित असल्याचं सांगितलं अन् त्यांच्यात ऑनलाईन चॅटिंग सुरु जाली. फोन नंबर एक्स्चेंज झाला, भेटीगाठी होऊ लागल्या. ५० वर्षाच्या व्यक्तीला २३ वर्षीय मिनल डेट करू लागली. सारे काही झाल्यानंतर त्या व्यक्तीचा खरी माहिती मिलनला झाली आणि फसल्याची भावना होऊ लागली. 

या व्यक्तीने तिला लग्न करण्याचं आमिष दाखवून तिच्याशी बऱ्याच वेळा जबरदस्तीने  शारीरिक संबंध प्रस्थापित केले. काही दिवसांनी तिला तो विवाहित असून त्याला दोन मुले असल्याचेही समजले. मिनलनं त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती काढून पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी गेली. तिथे तिला नकारात्मक वागणूक मिळाली. डेक्कन पोलीस स्टेशनला तक्रार दाखल झाली आहे. परंतू, या साऱ्या काळात तिला अशाप्रकारे अनेक मुलींची फसवणूक होते, आणि पोलिसात गेल्यावर या केसेस दाबल्या देखील जात असल्याचे धक्कादायक वास्तव तिला समजले. 
डिजिटल फ्रॉडच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. जसजशा टेक्नॉलॉजी येत गेल्या तसतसे ऐकिवात नसलेलेही फसवणुकीचे प्रकार व्हायला लागले आहेत. ज्यात सध्या डेटिंग ॲपचा उपयोग करून होणारे फसवणुकीचे प्रकार सर्रास ऐकायला मिळतात. 

सायबर गुन्हे शाखेत किती गुन्हे दाखल आहेत.
मॅट्रोमोनी फसवणूक - ६९ केस
गिफ्ट आमिष - ९४ केस
फोन कॉल फसवणूक - ३९१ केस
गेल्यावर्षी एकोणवीस हजार केस दाखल आहेत. त्यापैकी २५ ते ३० टक्के केस या सोशल साईट्स वरून फसवणुकीच्या आहेत. डेटिंग ॲपद्वारे फसवणुकीच्या प्रकारात आरोपी समोरच्याची संपूर्ण माहिती गोळा करण्यासाठी प्रयत्न करतात. समोरच्या व्यक्तीच्या आवडीनिवडी जाणून घेतल्या जातात. त्यासाठी खरंखुरं भासेल अशी सोशल मीडियावर किंवा ॲपवर प्रोफाईल तयार केले जाते. समोरून तुम्हाला अप्रोच केला जातो. किंवा डेटिंग ॲपवर तुमची प्रोफाईल बघून स्वतःची प्रोफाईल आरोपी बनवतो. जेणेकरून तुम्हाला मिळत्या - जुळत्या प्रोफाईलचं सजेशन येईल. अशाप्रकारे तुम्हाला जाळ्यात ओढलं जातं. 

"डेटिंग ॲपवरून ओळख झाल्यानंतर मैत्री किंवा प्रेम इथपर्यंत जाण्याअगोदर समोरच्याची पूर्ण माहिती मिळवली पाहिजे. समोरून सांगितल्या जात आहेत त्या गोष्टींवर थेट विश्वास ठेवणं धोकादायक आहे. आमच्याकडे बऱ्याच केस अशा झाल्या आहेत की समोरची व्यक्ती अविवाहित असल्याचं सांगते, पण ती व्यक्ती विवाहित असते. केवळ महिनोंमहिन्याच्या चॅटिंगवर करोडो रुपये दिल्याच्या घटना आमच्याकडे आलेल्या आहेत." 
- दगडू हाके, पो. नि. सायबर गुन्हे पुणे 

सोशल मीडियावरील ओळख पडतेय महागात - 
सोशल मीडियावरून महिला किंवा तरुणींना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्यांना लग्नाचे आमिष दाखविले जाते. त्यातून लैंगिक अत्याचार होतात. तसेच आर्थिक फसवणूक होण्याचेही प्रकार घडत आहेत. 

शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत दाखल गुन्हे : 

गुन्हे                 जुलै २०२२     जुलै २०२१ 
विवाहितेला क्रूर वागणूक देणे - २१९  - १६१ 
बलात्कार  -                    १७५  - १२८ 
विनयभंग  -                    २९५  - २०० 
अपहरण -                      ४०३  -  ३४४

डेटिंग ॲपवर खोट्या माहितीला बळी पडून फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे कोणाशीही नवी ओळख करताना समोरच्या व्यक्तीवर पूर्णपणे विश्वास न ठेवणे हाच एक बचावात्मक उपाय आहे. 

Web Title: A 50-year-old married man lured a 23-year-old girl from a dating app in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.