दागिण्याने मढलेल्या वास्तुशास्त्र सल्लागाराचे अपहरण करून खून; मृतदेह फेकला नदीत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 02:37 PM2022-10-31T14:37:39+5:302022-10-31T14:37:49+5:30

अपहरण आणि खूनाची उखल करण्यात बिबवेवाडी पोलिसांना यश

A bejeweled architectural consultant is kidnapped and murdered; The body was thrown into the river | दागिण्याने मढलेल्या वास्तुशास्त्र सल्लागाराचे अपहरण करून खून; मृतदेह फेकला नदीत

दागिण्याने मढलेल्या वास्तुशास्त्र सल्लागाराचे अपहरण करून खून; मृतदेह फेकला नदीत

Next

धनकवडी : अंगावर भरपूर दागिने घालून मिरवणाऱ्या वास्तुशास्त्र सल्लागाराचे अपहरण करुन खून करण्यात आला. खून करुन पुरवा नष्ट करण्यासाठी मृतदेह पोत्यात गुंडाळून निरा नदीत फेकून दिला. निलेश वरघडे (४३,रा. सुप्पर इंदिरा नगर, बिबवे वाडी) असे अपहरण करुन खून करण्यात आलेल्या वास्तूशास्त्र सल्लागाराचे नाव आहे. 

याप्रकरणी त्याचा मित्र दिपक जयकुमार नरळे (रा.नऱ्हे आंबेगाव) व त्याच्या साथीदार रणजित ज्ञानदेव जगदाळे, (वय २९ वर्षे) याच्यावर अपहर णाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांही आज सकाळी अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी रुपाली रुपेश वरघडे (४०) यांनी बिबवे वाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश वरघडे हा वास्तूशास्त्र सल्लागार म्हणून काम करीत होता. आरोपी हा निलेश हे एकमेकांना ओळखत होते. दरम्यान एका मेडिकल दुकानाची पुजा करण्याच्या उद्देशाने आरोपींने निलेश याला  नऱ्हे येथे घेऊन गेले होते. कॉफी मधून निलेशला झोपेच्या गोळ्या देण्यात आल्या. बेशुद्ध झाल्यानंतर त्याचा गळा दाबून खून करण्यात आला. खून केल्या नंतर पुरवा नष्ट करण्यासाठी मृतदेह निरा नदीत फेकून देण्यात आला होता.

तांत्रिकदृष्ट्या आरोपी दिपक याने खून केला असल्याचे स्पष्ट होत होते. मात्र तो सतत जबाब बदलत होता. मात्र त्याला पोलीसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला. दरम्यान सिसीटिव्हि फुटेज मध्ये आरोपी मृतदेह घेऊन जात असताना दिसून येत आहे. पोलिसांनी गुन्हयात वापरलेली एक इटींगा कार, दोन दुचाकी तसेच अपहृत इसमाचे सोन्याचे दागिने, दोन मोबाईल असा एकूण १९,१६,४००/ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. मात्र अद्यापही मृतदेहाचा शोध सुरू आहे.

Web Title: A bejeweled architectural consultant is kidnapped and murdered; The body was thrown into the river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.