गणेश विसर्जनासाठी गेलेला मुलगा नदीपात्रात बुडाला; नीरा नरसिंहपूर येथील घटना, शोधमोहीम सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 07:25 PM2024-09-17T19:25:58+5:302024-09-17T19:26:26+5:30
नीरा नरसिंहपूर येथील वेद अध्ययन शिकविणाऱ्या पाठशाळेत अनिकेत कुलकर्णी शिकत होता.
इंदापूर : नीरा नरसिंहपूर येथील नदीपात्रात गणेश विसर्जनासाठी आल्यानंतर,पाण्यात बुडालेल्या अनिकेत विनायक कुलकर्णी (रा.परांडा) या सोलापूर वर्षाच्या मुलाचा तपास अद्यापि लागलेला नाही. शोधकार्य जारी आहे.
नीरा नरसिंहपूर येथील वेद अध्ययन शिकविणाऱ्या पाठशाळेत अनिकेत कुलकर्णी शिकत होता. गणेश विसर्जनासाठी नदीपात्रात तो इतर मुलांसह गेला असता दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास तो पाण्यात बुडाला. ही घटना समजाताच तहसीलदार जीवन बनसोडे, घटनास्थळी दाखल झाले. जाळीच्या, होडीच्या सहाय्याने शोधमोहीम सुरु आहेत. पाण्यात कॅमेरा सोडण्यात आलेला आहे. भोईटे समाजाचे पट्टीचे पोहणारे युवक पाण्यात बुडी मारुन अनिकेतचा शोध घेत आहेत.हवालदार जे.डी.कळसाईत,हवालदार नामदेव मोरे,एपीआय. शंकर राऊत शोधमोहीमेस सहकार्य करत आहेत.भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी प्रशासनाशी संपर्क साधून, दुर्दैवी मुलाच्या युद्धपातळीवर शोधकार्यासाठी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.