वरंधा घाटात ६० फूट खोल दरीत बस कोसळली; अपघातात बसचालकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2023 02:48 PM2023-10-08T14:48:59+5:302023-10-08T14:49:37+5:30

बसचालकाचा मृत्यू तर गाडीतील दहा ते अकरा प्रवाशांपैकी तीन ते चार जण जखमी

A bus fell into a 60 feet deep gorge at Varandha Ghat Bus driver dies in an accident | वरंधा घाटात ६० फूट खोल दरीत बस कोसळली; अपघातात बसचालकाचा मृत्यू

वरंधा घाटात ६० फूट खोल दरीत बस कोसळली; अपघातात बसचालकाचा मृत्यू

googlenewsNext

भोर : भोर- महाड मार्गावरील वारवंड ते शिरगाव दरम्यान वरंधा घाटात मिनी बस ६० फुट खोल दरीत कोसळुन झालेल्या अपघातात एक ठार चार जखमी झाल्याची घटना राञी दोन वाजता घडली. स्वारगेटहून भोरमार्गे महाड-चिपळूणकडे जाणाऱ्या १७ सिटर मिनी बस (एमएच ०८ एपी १५३०) अपघात झाला आहे.

हा अपघात शनिवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास झाला. बस रस्ता सोडून धरणाच्या बाजूला ६० ते  ते ७० फूट खोल दरीत कोसळली. धरणाच्या पाण्यापासून पाच फुटांवर गाडी अधांतरीत थांबली. आणि मोठा अनर्थ टळला आहे. सदर अपघातात बसचालक अजिंक्य कोलते यांचा मृत्यू झाला आहे. या बसमधील इतर सर्व प्रवासी सुखरुप आहेत. गाडीत चालकासह दहा ते अकरा प्रवासी होते. त्यातील तीन ते चार जण जखमी झालेत. जखमींना भोर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर एक गंभीर जखमीला पुण्याला पाठवले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे गाडीवरील नियंत्रण सुटले. आणि ही दुर्घटना घडल्याची माहिती आहे.अपघात झाल्यानंतर गाडीतील चार जण कसेबसे दरीतून रस्त्यावर आले. त्यानंतर रस्त्याने जाणाऱ्या एका वाहनचालकाने अपघात स्थळापासून जवळच असलेल्या सह्याद्री हॉटेल मालकाला या अपघाताची माहिती दिली. त्यानंतर लागलीच हॉटेल मालक दत्ता पोळ, अक्षय धुमाळ,भीमा पोळ,संतोष पवार या शिरगावच्या तरुणांनी घटनास्थळी धाव घेऊन अधांतरीत असलेल्या बसला प्रथम दोरीने बांधले व त्यानंतर अपघातग्रस्त गाडीतीतील प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले. 

दरम्यान घटनेची माहिती कळताच भोरचे पोलिस निरीक्षक शंकर पाटील, पोलिस हवालदार दत्तात्रय खेंगरे, सुनील चव्हाण, चेतन कुंभार,अतुल मोरे,सह्याद्री रेस्क्यूचे सचिन देशमुख व टीमने घटनास्थळी पोचून अपघातातील व्यक्तींना बाहेर काढण्यास मदत करुन जखमींना रुग्णालयात पाठवले. यावेळी घटनास्थळी आंबवडे आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिकेत मांगले, चिकन मंजुश्री चिकणे, दिलीप देवघरे हजर होते.

Web Title: A bus fell into a 60 feet deep gorge at Varandha Ghat Bus driver dies in an accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.