महानगरपालिकेमध्ये नोकरी लावून देतो सांगत २१ लाखांना चुना, गुन्हा दाखल

By भाग्यश्री गिलडा | Published: December 2, 2023 02:53 PM2023-12-02T14:53:07+5:302023-12-02T14:53:38+5:30

याप्रकरणी राहुल सतीश कुलकर्णी (रा. सहकार नगर) याच्याविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

A case has been filed against 21 lakhs for giving jobs in the municipal corporation | महानगरपालिकेमध्ये नोकरी लावून देतो सांगत २१ लाखांना चुना, गुन्हा दाखल

महानगरपालिकेमध्ये नोकरी लावून देतो सांगत २१ लाखांना चुना, गुन्हा दाखल

पुणे : महापालिकेमध्ये नोकरी लावून देतो असे सांगून एकाची फसवणूक केल्याचा प्रकार वडगाव बुद्रुक परिसरात घडला आहे. याप्रकरणी राहुल सतीश कुलकर्णी (रा. सहकार नगर) याच्याविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रकांत गणपत पवार (रा. वडगाव बुद्रुक) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटल्यानुसार आरोपी राहुल कुलकर्णी याने फिर्यादींच्या भावाला महानगपालिकेमध्ये नोकरी लावून देतो असे सांगितले. त्यानंतर नोकरीला लागण्यासाठी पैसे भरावे लागतील असे सांगून एकूण ७ लाख ५० हजार रुपयांचा चेक आणि १३ लाख ५० हजार रुपये रोख रक्कम तक्रारदार यांच्या भावाकडून घेतली. एकूण २१ लाख रुपये घेऊनही नोकरीला लावून दिले नाही. याबाबत राहुल कुलकर्णी याला विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली.

फिर्यादींच्या भावाने दिलेले पैसे परत मागितल्यावर त्यांना पैसे परत केले नाही. आपली फसवणूक करण्यात आली आहे असे लक्षात येताच तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत जबाबब नोंदवला. याप्रकरणी राहुल सतीश पवार याच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळकृष्ण नाणेकर हे करत आहेत.

Web Title: A case has been filed against 21 lakhs for giving jobs in the municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.