मोबाइल टावर बसवण्याच्या बहाण्याने शेतकऱ्याला गंडा, गुन्हा दाखल
By नारायण बडगुजर | Published: January 6, 2024 05:29 PM2024-01-06T17:29:30+5:302024-01-06T17:30:02+5:30
पिंपरी : मोबाइल टावर बसवण्याच्या बहाण्याने शेतकऱ्याची ५४ हजार ४९० रुपयांची फसवणूक केली. शिरगाव येथे मोबाइल व इमेलव्दारे २ ...
पिंपरी : मोबाइल टावर बसवण्याच्या बहाण्याने शेतकऱ्याची ५४ हजार ४९० रुपयांची फसवणूक केली. शिरगाव येथे मोबाइल व इमेलव्दारे २ ते १६ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत फसवणुकीचा हा प्रकार घडला.
लिंबाजी रामभाऊ गायकवाड (५६, रा. शिरगाव, ता. मावळ) यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. ५) शिरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. मोबाइल नंबर धारक, एचडीएफसी बँक खातेधारक, मेलआयडीधारक या अनोळखी संशयित व्यक्तींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गायकवाड हे शेतकरी आहेत. संशयितांनी फिर्यादी गायकवाड यांना मोबाइलवरून तसेच वेळोवेळी इमेल आयडीवरून मेल करून मोबाइल टावर बसवण्यासाठी पैशांचे आमिष दाखवले. त्यानंतर फिर्यादी गायकवाड यांच्या राहत्या पत्त्यावर पोस्टाने व्हीआय कंपनीच्या नावाने बनावट कागदपत्रे पाठवून ५४ हजार ४९० रुपयांची फसवणूक केली.