रिक्षाचालकांच्या आंदोलनानंतर जाग, टॅक्सीबाईक 'रॅपिडो' कंपनीवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 04:48 PM2022-11-29T16:48:09+5:302022-11-29T16:50:15+5:30

महाराष्ट्र सरकारने परवाना दिला नसतानाही कंपनीकडून ऑनलाईन अ‍ॅप

A case has been filed against taxibike 'Rapido' company after the protest of rickshaw pullers | रिक्षाचालकांच्या आंदोलनानंतर जाग, टॅक्सीबाईक 'रॅपिडो' कंपनीवर गुन्हा दाखल

रिक्षाचालकांच्या आंदोलनानंतर जाग, टॅक्सीबाईक 'रॅपिडो' कंपनीवर गुन्हा दाखल

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, पिंपरी: महाराष्ट्र सरकाराचा कोणताही वैध परवाना नसतानाही अनधिकृत टॅक्सीबाईकची वाहतूक सेवा देणाऱ्या रोपन ट्रान्सपोर्टेशन सर्व्हेसेस (रॅपीडो) या कंपनीवर गुन्हा दाखल केला आहे. फेब्रुवारी २०२१ पासून २८ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत अ‍ॅपच्या माध्यमातून अनिधिकृत टॅक्सीबाईक धावत होत्या. या प्रकरणी पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मोटार वाहन निरीक्षक तानाजी शिवाजी धुमाळ (वय ४५) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात सोमवारी (२८) फिर्याद दिली. त्यानुसार रोपन ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस (रॅपिडो) या कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाईकटॅक्सी चालवण्या संदर्भात महाराष्ट्र सरकारने कोणताही परवाना दिला नसतानाही रॅपिडो या कंपनीकडून विनापरवनागी ऑनलाईन अ‍ॅप तयार केले. हे अप कायदेशीर असल्याचे भासवून दुचाकीचालकांकडून बेकायदेशीर प्रवासी वाहतूक आपल्या स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी करून घेतली.

Web Title: A case has been filed against taxibike 'Rapido' company after the protest of rickshaw pullers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.