विवाहाच्या आमिषाने महिलेवर बलात्कार करून फोटो व्हायरलची धमकी, गुन्हा दाखल
By नितीश गोवंडे | Updated: June 13, 2024 16:36 IST2024-06-13T16:34:05+5:302024-06-13T16:36:22+5:30
पुणे : विवाहाच्या आमिषाने महिलेवर बलात्कार करून छायाचित्रे समाजमाध्यमात प्रसारित करण्याची धमकी देणाऱ्या एकाविरुद्ध चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ...

विवाहाच्या आमिषाने महिलेवर बलात्कार करून फोटो व्हायरलची धमकी, गुन्हा दाखल
पुणे : विवाहाच्या आमिषाने महिलेवर बलात्कार करून छायाचित्रे समाजमाध्यमात प्रसारित करण्याची धमकी देणाऱ्या एकाविरुद्ध चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका महिलेने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी विपुल राम आडे (३५, रा. आनंद पार्क, गणेशनगर, वडगाव शेरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आढे याची चार वर्षांपूर्वी महिलेशी ओळख झाली होती. महिलेला त्याने विवाहाचे आमिष दाखवले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. त्याने महिलेची छायाचित्रे माेबाइलवर काढली हाेती. महिलेने विवाहाबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने छायाचित्रे समाजमाध्यमात प्रसारित करण्याची धमकी दिली. आढेच्या त्रासामुळे घाबरलेल्या महिलेने चंदननगर पोलिसांकडे तक्रार दिली. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक माने करत आहेत.