Pune: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या MBA पेपरफुटीबद्दल गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2023 07:56 PM2023-12-23T19:56:17+5:302023-12-23T19:56:48+5:30
याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे....
पिंपरी : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एमबीए प्रथम सत्राची परीक्षा सुरू आहे. शुक्रवारी (दि. २२) परीक्षा सुरू असताना पेपर फुटला. प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली. याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
प्रा. सुनील श्यामराव धनवडे (वय ५२, रा. वडगाव बुद्रुक, पुणे) यांनी याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार परीक्षेला बसलेल्या संबंधित विद्यार्थी अथवा परीक्षा प्रक्रियेत सहभागी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिपत्याखाली डॉ. डी. वाय. पाटील सेंटर फॉर मॅनेजमेंट अँड रिसर्च महाविद्यालय नेवाळे वस्ती, चिखली येथे एमबीएच्या प्रथम वर्षाच्या प्रथम सत्राची परीक्षा सुरू आहे. परीक्षेसाठी १८३ विद्यार्थी बसले आहेत. शुक्रवारी ‘लिगल अस्पेक्टस बिजनेस’ या विषयाचा पेपर होता. पेपर सुरू असताना अज्ञाताने अथवा परीक्षा प्रक्रियेत सहभागी झालेल्या अज्ञात व्यक्तीने ‘लिगल अस्पेक्टस बिजनेस’ या विषयाची प्रश्नपत्रिका व्हायरल केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलिस तपास करीत आहेत.