महादेव बाबर, पोलीस निरीक्षक जानकर यांच्यासह २० जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2022 08:57 AM2022-07-08T08:57:21+5:302022-07-08T08:57:27+5:30

भारत बंदच्या दरम्यान स्टॉल उघडा असल्याने दुकानातील साहित्य रस्त्यावर फेकून देऊन जातीवाचक शिवीगाळ केली होती

A case has been registered against 20 persons including Mahadev Babar and Inspector Jankar | महादेव बाबर, पोलीस निरीक्षक जानकर यांच्यासह २० जणांवर गुन्हा दाखल

महादेव बाबर, पोलीस निरीक्षक जानकर यांच्यासह २० जणांवर गुन्हा दाखल

googlenewsNext

पुणे: भारत बंदच्या दरम्यान स्टॉल उघडा असल्याने दुकानातील साहित्य रस्त्यावर फेकून देऊन जातीवाचक शिवीगाळ शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली. त्याची तक्रार देण्यासाठी कोंढवा पोलीस ठाण्यात गेल्यावर त्यांची तक्रार न घेता त्यांना हाताने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनीमहादेव बाबर, पोलीस निरीक्षक जानकर यांच्यासह २० जणांवर ॲट्रॉसिटी ॲक्टखाली गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी कोंढवा येथील एका ३४ वर्षांच्या नागरिकाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना १० ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता ते ११ ऑक्टोबर रोजी पहाटे ४ वाजण्याच्या दरम्यान कोंढवा येथील कोणार्क पुरम सोसायटीबाहेर व पोलीस ठाण्यात घडला आहे. याप्रकरणी न्यायालयाने सीआरपीसी १५६(१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नारायण लोणकर, महादेव बाबर, अब्दुल बागवान, अस्लम बागवान, राजेंद्र बाबर, दीपक रमाणी, सईद शेख, राजू सय्यद, पोलीस निरीक्षक जानकर, सहायक पोलीस निरीक्षक मोहिते, सहायक फौजदार कामथे, हवालदार गरुड, पोलीस शिपाई नदाफ, सुब्बनवाड, महिला पोलीस शिपाई सुरेखा बडे व इतर ४ ते ५ जण अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

Web Title: A case has been registered against 20 persons including Mahadev Babar and Inspector Jankar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.