लोणावळ्यात भटक्या कुत्र्यांना मारहाण केल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2022 08:51 AM2022-09-13T08:51:59+5:302022-09-13T08:52:44+5:30

आरोपीविरोधात गुन्हा दाखल...

A case has been registered against four people for beating stray dogs in Lonavala | लोणावळ्यात भटक्या कुत्र्यांना मारहाण केल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल

लोणावळ्यात भटक्या कुत्र्यांना मारहाण केल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल

Next

लोणावळा : रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांना लाकडी दांडक्याने मारहाण करणे चौघांना चांगलेच महागात पडले आहे. गोल्ड व्हॅली परिसरात घडलेल्या या घटनेनंतर चार जणांवर लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 133/22 भादवी कलम 429,34 व प्राण्यांना कुरतेने वागणूक देणे प्रतिबंधक अधिनियमचे कलम 11(1)(A) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी प्रियंका व्हिस्पी बालापोरीया यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नितीन विदप्पा आहिरे, राजेष गणेश आचार्य, संजय वासु आचार्य, मोहन यादव (सर्व रा. स्वारंग सोसायटी गोल्डव्हॅली सेक्टर डी. न्यु तुंगार्ली लोणावळा ता. मावळ जि. पुणे) यांच्यावर सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती लोणावळा शहर पोलिसांनी दिली.

7 सप्टेंबर 2022 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास स्वारंग सोसायटी गोल्डव्हॅली सेक्टर डी. न्यु तुंगाली लोणावळा मावळ जि. पुणे येथील बंगला नं 12 से गेटचे जवळ वरील चोघांनी संगनमत करून काही एक कारण नसताना काही भटक्या जातीच्या कुत्र्यांना लाकडी दांडक्याच्या सहाय्याने बेदम मारहाण करून मुक्या प्राण्यांना कुरतेने वागणूक दिली. त्यापैकी तीन कुत्र्यांना विकलांग करून आगळीक करून त्यापैकी एका काळे रंगाचे कुत्र्याला लाकडी दांडक्याचे साहयाने तोंडावर, पायावर जबर मारहाण करून जिवे ठार मारून सदर काळे रंगाचे कुत्र्याची बॉडी कोठेतरी अज्ञात स्थळी टाकून देवून व्हिलेवाट लावली आहे. म्हणून माझी वरील इसमांविरूध्द कायदेशीर फिर्याद आहे असे प्रियंका बालापोरीया यांनी फिर्यादीत म्हंटले आहे.

त्यांच्या फिर्यादीवरून लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अबनावे यांनी गुन्हा दाखल केला असून असून पोलीस हवालदार लक्ष्मण उंडे या घटनेचा तपास करत आहेत.

Web Title: A case has been registered against four people for beating stray dogs in Lonavala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.