बीएचआर प्रकरण: विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण याच्यावर १ कोटी २२ लाख रुपयांची खंडणी घेतल्याचा गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2023 11:41 PM2023-01-16T23:41:49+5:302023-01-16T23:43:47+5:30

crime News: २ कोटी रुपयांची मागणी करुन १ कोटी २२ लाख रुपये खंडणी उकळल्याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी तत्कालीन विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

A case has been registered against Special Public Prosecutor Praveen Chavan for extortion of Rs 1 crore 22 lakh | बीएचआर प्रकरण: विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण याच्यावर १ कोटी २२ लाख रुपयांची खंडणी घेतल्याचा गुन्हा दाखल

बीएचआर प्रकरण: विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण याच्यावर १ कोटी २२ लाख रुपयांची खंडणी घेतल्याचा गुन्हा दाखल

Next

पुणे : जळगाव मधील गाजलेल्या भाईचंद हिरांचद रायसोनी क्रेडिट सोसायटीतील (बीएचआर) घोटाळा प्रकरणात जामीन मिळवून देण्यास सहकार्य करण्याचे आश्वासन देऊन २ कोटी रुपयांची मागणी करुन १ कोटी २२ लाख रुपये खंडणी उकळल्याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी तत्कालीन विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये विशेष लेखापरिक्षक शेखर सोनाळकर (रा. जळगाव) आणि उदय नानाभाऊ पवार (रा. चाळीसगाव, जळगाव) यांचाही समावेश आहे.

याप्रकरणी सुरज सुनिल झंवर (वय ३१, रा. जळगाव) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बीएच आरच्या गुन्ह्यात सुनिल झंवर यांना जामीन मिळण्याकामी सहकार्य करेन. पैसे दिले नाही तर तुन्हा दोघांना नुकसान पोहचवेल. जामीन मिळवून देणार नाही. तसेच कोथरुडमधील गुन्ह्यात फिर्यादी यांना अडकविण्याची धमकी देऊन २ कोटी रुपयांची मागणी केली. त्यातील १ कोटी रुपये चव्हाण यांनी स्वत:कडे ठेवले व २० लाख रुपये उदय पवार याने मध्यस्थ म्हणून स्वत:साठी घेतले व २ लाख रुपये हवाल्याच्या मोबदला म्हणून चाळीसगाव येथील ओरिजनल वाईन शॉप येथे २६ नोव्हेबर २०२१ रोजी घेतले. तसेच जामिनासाठी मदत केली नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

काय आहे प्रकरण
बीएचआर सोसायटी ठेवीदारांचे पैसे परत करण्यास असमर्थ ठरल्यामुळे २७ ऑक्टोबर २०१५ मध्ये त्यावर लिक्वीडेटर जितेंद्र कंडारे याची नेमणूक करण्यात आली होती. कर्जदारांच्या मालमत्ता जप्त करुन त्या जाहीर ई लिलावाद्वारे विकून ठेवीदारांचे देणी परत करण्याची कार्यवाही करत असताना कंडारे याने सुनिल झंवर इतरांशी संगनमत करुन ठेवीदारांकडून ठेवीच्या पावत्या कमी किंमतीत घेऊन त्यात भष्ट्राचार केल्याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने जळगावात मोठ्या प्रमाणावर छापे घालून अनेकांना ताब्यात घेतले. जवळपास टेम्पो भरुन कागदपत्रे जप्त केली होती. या गुन्ह्यात प्रवीण चव्हाण यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्यात आली होती. तसेच फॉरेन्सिक ऑडिटर म्हणून शेखर सोनाळकर यांची नेमणूक करण्यात आली होती. या गुन्ह्यात सुनिल झंवर यांना १० ऑगस्ट २०२१ रोजी अटक करण्यात आली. त्यांच्या जामिनासाठी विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी वेळोवेळी विरोध केला. ११ ऑगस्ट २०२१ रोजी प्रविण चव्हाण यांनी त्रयस्थामार्फत फिर्यादीला निरोप दिला की, तुझ्या वडिलांची ४-५ वर्षे जेलमध्ये वाट लावून टाकतो, मी या पूर्वी सुरेशदादा जैन, डिएसकेचे कुलकर्णी व इतर आरोपींची देखील वाट लावलेली आहे. तुमच्या कुटुंबीयांची जप्त केलेली बँक खाती पुढील १० वर्षात मुक्त होऊ देणार नाही, तेव्हा काही तर पुर्तता करर तरच फायदा होईल, अन्यथा आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल अशी धमकी दिली. त्यानंतर फिर्यादी यांनी २६ नोव्हेबर २०२१ रोजी उदय पवार याच्याकडे १ कोटी २२ लाख रुपयांची खंडणी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

सुनिल झंवर यांना २२ फेब्रुवारी २०२२ रोजी जामीन मिळाला. त्यानंतर फिर्यादी यांनी आपल्या वडिलांना या खंडणीविषयी सांगितले. त्यानंतर त्यांनी उदय पवार याच्याशी संपर्क साधल्यावर त्याने चव्हाण याच्याशी संपर्क साधल्यावर तुझे बँक खाते कसे ओपन होता ते पाहतो, तुला इतर दोन केसमध्ये देखील तोंड द्यावे लागेल, अशी धमकी दिली.

Web Title: A case has been registered against Special Public Prosecutor Praveen Chavan for extortion of Rs 1 crore 22 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.