राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे उपाध्यक्ष दयानंद इरकल यांना मारहाण करणार्‍या महिला वकिलावर गुन्हा दाखल

By विवेक भुसे | Published: June 2, 2023 10:51 AM2023-06-02T10:51:45+5:302023-06-02T10:56:18+5:30

यापूर्वी महिला वकिलाचा विनयभंग केल्याप्रकरणी दयानंद इरकल यांच्यासह चार जणांवर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली होती

A case has been registered against the woman lawyer who assaulted NCP Vice President Dayanand Irkal | राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे उपाध्यक्ष दयानंद इरकल यांना मारहाण करणार्‍या महिला वकिलावर गुन्हा दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे उपाध्यक्ष दयानंद इरकल यांना मारहाण करणार्‍या महिला वकिलावर गुन्हा दाखल

googlenewsNext

पुणे : कारला साईड देण्यावरुन झालेल्या वादात राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे उपाध्यक्ष दयानंद इरकल यांना शिवीगाळ करुन बेदम मारहाण केल्याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी एका महिला वकिलावर गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी महिला वकिलाचा विनयभंग केल्याप्रकरणी दयानंद इरकल यांच्यासह चार जणांवर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली होती. हा प्रकार सेनापती बापट रोडवरील पत्रकारनगर चौकात १३ फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठ वाजता घडला होता.

याबाबत संध्या हणमत माने इरकल (वय ४५, रा. प्रबुद्ध सोसायटी, गोखलेनगर) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महिला वकिलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व फिर्यादीचे पती हे कारमधून जात असताना दुचाकीवरुन आलेल्या तरुणीला साईड दिली नाही, म्हणून ती शिवीगाळ करुन पुढे निघून गेली. पुढे सिग्नल असल्याने फिर्यादीने खाली उतरुन आरोपीस तू माझे पतीस शिवीगाळ का केली, असे विचारले असता आरोपीने शिवीगाळ करुन हाताने मारहाण करुन तिच्या जवळील शस्त्राने फिर्यादीचे गालावर वार करुन गंभीर जखमी केले. फिर्यादीचे गळ्यातील सोन्याची चैन हिसकविण्याचा प्रयत्न केला. तसेच फिर्यादीचे पती दयानंद इरकल हे मध्यस्थी करण्यास आले असताना त्यांनाही शिवीगाळ करुन मारहाण केली.

याबाबत चतु:श्रृंगी पोलिसांनी त्यांची फिर्याद न घेतल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़. पोलीस उपनिरीक्षक गाडेकर तपास करीत आहेत. यापूर्वी या महिला वकिलांच्या फिर्यादीनुसार चतु:श्रृंगी पोलिसांनी दयानंद इरकल त्यांना  अटक केली होती. या महिलाने दिलेल्या फिर्यादीनुसार, त्या दुचाकीवरुन पूना हॉस्पिटलच्या दिशेने जात होत्या. त्यावेळी त्यांच्यापुढे असलेल्या कारला त्यांनी हॉर्न दिला. त्याचा इरकल याला राग आला. त्याने गाडीतून खाली उतरून या महिलेचा विनयभंग केला. गाडीत बसलेल्या संध्या माने इरकल यांनी त्या तरुणीच्या गालावर आणि गळ्यावर नखांनी बोचकारले. तसेच हाताने व चपलेने मारहाण केली, असे त्यात म्हटले होते.

Web Title: A case has been registered against the woman lawyer who assaulted NCP Vice President Dayanand Irkal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.