इंदापूरात सोशल मिडीयावर 2 धर्मांमध्ये द्वेष भावना पसरवल्याच्या आरोपांवरुन दोघांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2023 09:23 AM2023-06-16T09:23:49+5:302023-06-16T09:23:57+5:30
सोशल मिडीयावर दोन धर्मामध्ये शत्रुत्वाची व व्देष भावना निर्माण करणारी चित्रफीत प्रसारीत करणे व खोटी अफवा पसरवून सार्वजनिक शांततेचा भंग केला
इंदापूर : सोशल मिडीयावर दोन धर्मामध्ये शत्रुत्वाची व व्देष भावना निर्माण करणारी चित्रफीत प्रसारीत करणे व खोटी अफवा पसरवून सार्वजनिक शांततेचा भंग करणारा मजकुर प्रसारीत करण्याच्या आरोपांवरुन आज (दि.१५) रात्री उशीरा इंदापूर पोलीस ठाण्यात वरकुटे खुर्द येथील दोघांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.
अक्षय शिवाजी शिंदे,बबलु पठाण (दोघे रा. वरकुटे खुर्द ता.इंदापूर) अशी आरोपींची नावे आहेत. पोलीस कर्मचारी समाधान केसकर यांनी त्यांच्या विरुध्द वेगवेगळ्या फिर्यादी दिल्या आहेत. अक्षय शिंदे या इंन्स्टाग्राम अकाऊंन्टवरुन इस्लाम धर्माबद्दल द्वेषभावना निर्माण होईल अशी रिल प्रसारीत केली. असा अक्षय शिंदे याच्यावर आरोप आहे. तर पै. बबलु पठाण या अकाउंटवरुन कत्तलीसाठी विकल्या जात असलेल्या जनावरांबद्दल मजकूर प्रसारीत करण्यात आल्याचा आरोप पठाण यांचेवर ठेवण्यात आला आहे.