देवेंद्र फडणवीसांची सोशल मीडियावर बदनामी, पुण्यात गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 12:35 PM2022-11-19T12:35:48+5:302022-11-19T12:43:21+5:30

सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल...

A case has been registered in Pune for defaming Home Minister Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांची सोशल मीडियावर बदनामी, पुण्यात गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

देवेंद्र फडणवीसांची सोशल मीडियावर बदनामी, पुण्यात गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

googlenewsNext

वाघोली (पुणे) : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर टाकल्याबद्दल लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे जिल्हा भाजपा युवा मोर्चाचे संघटन सरचिटणीस संदीप सातव यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात या संदर्भात फिर्याद दिली आहे.

याबाबत पुणे जिल्हा भाजपा युवा मोर्चाचे संघटन सरचिटणीस संदिप सातव, हवेली तालुका विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष ओंकार कंद, हवेली तालुका युवा मोर्चाचे सरचिटणीस गौरव झुरूंगे, समीर झुरूंगे यांनी लोणीकंद पोलिसांत उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करण्याचे लेखी निवेदन लोणीकंद पोलिसांना दिले होते.

काय आहे प्रकरण?

लोणीकंद पोलीस ठाण्यात देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर टाकल्याप्रकरणी सोशल मीडिया आयडी धारक अनिल हरपळे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने देवेंद्र फडणवीस यांचा फोटो वापरून एक मिम तयार केले होते. त्यामध्ये आक्षेपार्ह मजकूर टाकला होता. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी अधिक तपास लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांच्या मार्गदर्शना खाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरज गोरे करत आहेत.

Web Title: A case has been registered in Pune for defaming Home Minister Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.