Pune | कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निलंबित प्रशासकाविरोधात विनयभंगासह अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

By विवेक भुसे | Published: April 12, 2023 03:02 PM2023-04-12T15:02:44+5:302023-04-12T15:05:06+5:30

एका ४५ वर्षाच्या महिलने मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली...

A case of atrocity including molestation has been registered against the suspended administrator of the Agricultural Produce Market Committee | Pune | कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निलंबित प्रशासकाविरोधात विनयभंगासह अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

Pune | कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निलंबित प्रशासकाविरोधात विनयभंगासह अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

googlenewsNext

पुणे : भाजी मार्केटमध्ये लिंबु विक्री करणाऱ्या महिलेस जातीवाचक शिवीगाळ करुन तिचा विनयभंग केल्याबद्दल कृषि उत्पन्न बाजार समितीचा निलंबित प्रशासकासह २० ते २५ जणांवर अ‍ॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी एका ४५ वर्षाच्या महिलने मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कृषि उत्पन्न बाजार समितीचा निलंबित प्रशासक मधुकांत गरड, दत्तात्रय कळमकर, संभाजी काजळे, अमोल घुले व इतर २० ते २५ जणांवर विनयभंग व अ‍ॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जुलै २०२२ ते २ फेब्रुवारी २०२३ दरम्यान माकेटयार्ड येथील भाजी मार्केटमध्ये घडला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या भाजी मार्केट येथे लिंबु विक्रीचा व्यवसाय करत असत. मधुकांत गरड याने फिर्यादीस मारहाण करुन त्यांच्या लिंबुच्या मालाची चोरी करुन त्यांना जातीवाचक शिवीगाळ करुन येथे येऊन धंदा करुन काय मार्केट नासवत आहे काय असे म्हणाला. कृषि उत्पन्न बाजार समितीचे लोक तेथे येऊन फिर्यादी यांचे लिंबुच्या पाट्या व पिशव्या फेकून देऊन मार्केटमध्ये येऊन २० ते ३० लोकांना चिथावणी देऊन फिर्यादी यांच्या अंगाला हात लावून अश्लिल बोलला. एके दिवशी फिर्यादी या लिंबु विक्री करत असताना मधुकांत गरड याने त्यांच्याकडे पाहुन अश्लिल हावभाव विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस आयुक्त पोर्णिमा तावरे तपास करीत आहेत.

Web Title: A case of atrocity including molestation has been registered against the suspended administrator of the Agricultural Produce Market Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.