सिमेंटचा ट्रक उलटला, खाली हमाल चिरडला; पुणे-सोलापूर महामार्गावरील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2024 11:21 AM2024-02-01T11:21:10+5:302024-02-01T11:21:35+5:30
दुर्घटनेस जबाबदार ट्रकचालकाविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे....
पुणे : सिमेंट वाहतूक करणारा ट्रक उलटून कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना पुणे-सोलापूर रस्त्यावर घडली. करण गुरुनाथ देडे (३२, रा. गिरमे वस्ती, उरळी कांचन, सोलापूर रस्ता) असे मृत कामगाराचे नाव असून, दुर्घटनेस जबाबदार ट्रकचालकाविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत करणची पत्नी लक्ष्मी (२४) हिने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, करण हा हमाली काम करतो. पुणे-सोलापूर रस्त्यावर कुंजीरवाडी परिसरात सिमेंट वाहतूक करणारा ट्रक उलटला. ट्रकने रस्त्याच्या कडेला असलेल्या महावितरणच्या रोहित्राला धडक दिली. यात रोहित्राचे नुकसान झाले. ट्रकमधील हमाल करण याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. पोलिस उपनिरीक्षक अमोल घोडके तपास करत आहेत.