चेअरमन होण्यावरुन दोघा ज्येष्ठांमध्ये जुंपली; परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल

By विवेक भुसे | Published: December 5, 2023 03:32 PM2023-12-05T15:32:20+5:302023-12-05T15:32:38+5:30

६० वर्षाच्या ज्येष्ठाने फिर्याद दिली असून पोलिसांनी चेअरमन यांच्यावर गुन्हा दखल केला आहे

A clash between the two seniors on becoming the chairman; Cases filed against each other | चेअरमन होण्यावरुन दोघा ज्येष्ठांमध्ये जुंपली; परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल

चेअरमन होण्यावरुन दोघा ज्येष्ठांमध्ये जुंपली; परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल

पुणे: दोघेही ज्येष्ठ नागरिक, एकाच सोसायटीत राहणारे, एक चेअरमन तर दुसर्याला चेअरमन होण्याची इच्छा त्यातून या दोघा ज्येष्ठांमध्ये चांगलीच जुंपली. एकमेकांना चप्पलने मारहाण करुन खुर्ची फेकून जखमी केले गेले. हे प्रकरण पोलिसांकडे गेल. पोलिसांनी दोघांवरही गुन्हे दाखल करुन टाकले. हा प्रकार वडगाव येथील नवले पुलाजवळील डि़ व्हिस्टेरिया पार्क या सोसायटीत रविवारी सायंकाळी सव्वासात वाजता घडला.

याबाबत एका ६७ वर्षाच्या ज्येष्ठाने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी ६० वर्षाच्या नागरिकांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकाच सोसायटीत रहायला आहे. फिर्यादी हे सोसायटीचे चेअरमन आहेत. तर आरोपींना चेअरमन व्हायचे आहे. आरोपीने रागामध्ये तू चेअरमन पदाचा राजीनामा दे मला चेअरमन व्हायचे आहे. तू मला कोणतेही काम सांगायचे नाही, असे म्हणत शिवीगाळ करुन प्लास्टिकची खुर्ची फिर्यादींना फेकून मारुन जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली़.

याविरोधात ६० वर्षाच्या ज्येष्ठाने फिर्याद दिली असून पोलिसांनी चेअरमन यांच्यावर गुन्हा दखल केला आहे. फिर्यादी हे चेअरमन यांना तुम्ही मला चेअरमन नको आहे, असे म्हणाले असताना चेअरमन यांना त्याचा राग येऊन त्यांनी शिवीगाळ करुन पायातील चप्पल काढून देशपांडे यांना मारली. शेजारील प्लास्टिक खुर्चीने मारहाण करुन जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली. पोलीस हवालदार कुंभार तपास करीत आहेत.

Web Title: A clash between the two seniors on becoming the chairman; Cases filed against each other

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.