पुणे रेल्वे स्टेशनवर मध्यरात्री एका डब्ब्याला आग; सुदैवाने जिवितहानी नाही

By नितीश गोवंडे | Published: February 13, 2024 11:03 AM2024-02-13T11:03:48+5:302024-02-13T11:16:35+5:30

अग्निशमन केंद्र व मुख्यालयातून एक वाॅटर टँकर अशी एकुण चार वाहने तातडीने रवाना करण्यात आली.

A coach caught fire at midnight at Pune railway station; No injuries or fatalities | पुणे रेल्वे स्टेशनवर मध्यरात्री एका डब्ब्याला आग; सुदैवाने जिवितहानी नाही

पुणे रेल्वे स्टेशनवर मध्यरात्री एका डब्ब्याला आग; सुदैवाने जिवितहानी नाही

पुणे : रविवारी मध्यराञी ०१:५८ च्या सुमारास (दि.१३) पुणेरेल्वे जंक्शन येथे रेल्वेच्या डब्बयाला भीषण आग लागली. अग्निशमन दल नियंत्रण कक्षाला याची माहिती मिळताच घटनेचे गांभीर्य ओळखून दलाकडून नायडू, येरवडा, बी.टी.कवडे रोड अग्निशमन केंद्र व मुख्यालयातून एक वाॅटर टँकर अशी एकुण चार वाहने तातडीने रवाना करण्यात आली.

घटनास्थळी पोहोचताच सदर ठिकाणी क्वीन्स गार्डनच्या पाठीमागील बाजूकडे (कॉम्प्रेसर रुमनजीक) चार क्रमांक रेल्वे मार्ग येथे बऱ्याच दिवसापासून उभ्या असलेल्या रेल्वेच्या तीन डब्ब्यापैंकी मधल्या एका डब्ब्याला आग लागल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर लगेचच विद्युत विभागाशी संपर्क साधत विद्युत प्रवाह बंद करण्याच्या सूचना देत जवानांनी लगेच पाण्याचा मारा सुरू केला. आतमध्ये कोणी प्रवासी अथवा रेल्वे कर्मचारी नसल्याची खाञी केली व सुमारे अर्धा तासात आगीवर नियंञण मिळवत पुढे कुलिंग ऑपरेशन सुरू ठेवत रेल्वे कर्मचारी यांच्या मदतीने इतर दोन डबे सुरक्षित ठिकाणी नेत धोका दूर केला. त्यानंतर आगीवर सतत पाण्याचा मारा सुरू ठेवत आग पुर्ण विझवली. दलाची मदत पोहोचण्यापुर्वी रेल्वे कर्मचारी यांनी उपलब्ध असणाऱ्या छोट्या नळीच्या साह्याने पाणी मारत आग विझवण्याचे प्रयत्न केले. घटनास्थळी रेल्वे पोलिस विभागाची मदत उपस्थित होती. आग कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही. सदर घटनेत कोणी जखमी वा जिवितहानी नसून जळालेल्या एका डब्ब्याचे पुर्ण नुकसान झाले आहे. यावेळी अग्निशमन दलाचे सहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी विजय भिलारे व जवळपास वीस जवानांनी आग विझवण्यात सहभाग घेतला.

Web Title: A coach caught fire at midnight at Pune railway station; No injuries or fatalities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.