भरदिवसा महाविद्यालयीन तरूणीला पळवून नेऊन बलात्कार; पुणे शहरातील धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 19:55 IST2022-07-23T19:55:01+5:302022-07-23T19:55:02+5:30
डेक्कन पोलिसांनी आरोपीवर गन्हा दाखल केला...

भरदिवसा महाविद्यालयीन तरूणीला पळवून नेऊन बलात्कार; पुणे शहरातील धक्कादायक प्रकार
पुणे : किरकोळ कारणावरून वाद झाला असताना कॉलेजवर येऊन दुचाकीवरून जबरदस्तीने तरुणीला चाकणला घेऊन जात बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी शेरखान शब्बीर सय्यद (वय २५, रा. वारजे माळवाडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पीडित तरुणीने डेक्कन पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
हा प्रकार कर्वे रोडवरील महाविद्यालयापासून चाकण एमआयडीसी येथील वीटभट्टी जवळील एका खोलीत बुधवारी दुपारी २ ते गुरुवारी दुपारी ४ वाजेच्या दरम्यान घडला.
अधिक माहितीनुसार,फिर्यादी व आरोपी यांच्यात एक महिन्यांपूर्वी किरकोळ वाद झाला होता. फिर्यादी दि. २० जुलै रोजी कॉलेजला गेल्या असताना तो तेथे आला. तुझ्याशी ५ मिनिटे बोलायचे आहे असे सांगून फिर्यादीला बाहेर घेऊन येत दुचाकीवरून चाकणला नेले. आरडा ओरडा केला तर जीवे मारून टाकील, अशी धमकी देऊन फिर्यादीवर बलात्कार केला. पुन्हा दुचाकीवरून कॉलेजजवळ आणून सोडले. पोलीस उपनिरीक्षक कवटीकर तपास करीत आहेत.