सिंहगडावर सहलीसाठी आलेल्या महाविद्यालयीन युवकाचा हत्ती टाकेत बुडून मृत्यू

By विवेक भुसे | Published: September 18, 2022 07:29 PM2022-09-18T19:29:42+5:302022-09-18T20:04:20+5:30

विद्यार्थी मुळशी तालुक्यातील एका कनिष्ठ माध्यमिक विद्यालयात बारावीत शिकत होता

A college youth who came for a trip to Sinhagad drowned in an elephant tank | सिंहगडावर सहलीसाठी आलेल्या महाविद्यालयीन युवकाचा हत्ती टाकेत बुडून मृत्यू

सिंहगडावर सहलीसाठी आलेल्या महाविद्यालयीन युवकाचा हत्ती टाकेत बुडून मृत्यू

googlenewsNext

पुणे : सिंहगडावर सहलीसाठी आलेल्या महाविद्यालयीन युवकाचा हत्ती टाकेत बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी घडली. शाहिद मुल्ला असे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो मुळशी तालुक्यातील एका कनिष्ठ माध्यमिक विद्यालयात बारावीत शिकत होता. 

मुळशी तालुक्यातील एका स्कुलमधील ६० विद्यार्थी आणि शिक्षक सिंहगडावर रविवारी सहलीसाठी आले होते. दुपारी बाराच्या सुमारास सिंहगडावरील देवटाके आणि हत्तीटाके परिसरात शाहिद आला. पावसामुळे परिसर निसरडा झाला आहे. पावसामुळे देवटाके तसेच हत्ती टाके पाण्याने पूर्ण भरले आहे. पावसामुळे टाक्यांच्या परिसरात शेवाळे जमा झाले आहे. शेवाळावरुन शाहिदचा पाय घसरला आणि तो टाकीत पडला. या घटनेची माहिती शिक्षकांनी त्वरीत सिंहगडावरील व्यावसायिकांना दिली. त्यानंतर अमोल पढेर, विठ्ठल पढेर, आकाश बांदल, विकास जोरकर, तुषार डिंबळे, पवन जोरकर, सूरज शिवतारे यांनी पाण्यात शोधमाेहिम राबवली.

शाहिदला पाण्यातून बाहेर काढण्यात आले. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी खेड शिवापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला आहे. या घटनेमुळे सहकारी विद्यार्थी तसेच शिक्षकांना धक्का बसला असून हवेली पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

Web Title: A college youth who came for a trip to Sinhagad drowned in an elephant tank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.