खंडाळा घाटातील अंडा पाॅईटजवळ कंटेनर आणि पिकअपचा भीषण अपघात; एक ठार, दोन जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2023 10:24 IST2023-06-24T10:23:38+5:302023-06-24T10:24:28+5:30
जखमींमध्ये एका शाळकरी मुलाचा समावेश आहे...

खंडाळा घाटातील अंडा पाॅईटजवळ कंटेनर आणि पिकअपचा भीषण अपघात; एक ठार, दोन जण जखमी
लोणावळा (पुणे) : मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर खंडाळा घाटातील अंडा पॉईंट येथील वळणावर एक भरधाव वेगातील कंटेनर समोर जाणाऱ्या दोन पिकअप टेम्पोला धडकून एका पिकअप टेम्पोवर पलटी झाला. या भीषण अपघातामध्ये पिकअप चालकाचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एका शाळकरी मुलाचा समावेश आहे. आज सकाळी हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, लोणावळ्यातून मुंबईच्या दिशेने सदर कंटेनर भरधाव वेगात निघाला होता. अंडा पॉईंट येथील उतार व वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने त्याने दोन पिकअप टेम्पो गाड्यांना धडक दिली व पलटी झाला. यावेळी एक पिकअप गाडी कंटेनरच्या खाली गेली. यामध्ये पिकअप चालकाचा गाडीमध्ये अडकल्याने मृत्यू झाला तर जखमी दोघांना महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची देवदूत यंत्रणा व खोपोली येथील अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी रेस्क्यू करत बाहेर काढत उपचारासाठी दाखल केले.
अपघाताची माहिती समजल्यानंतर बोरघाट पोलीस यंत्रणा, खोपोली पोलीस, आय आर बी, यांच्यासह विविध यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. क्रेनच्या सहाय्याने कंटेनर बाजूला करत पिकप गाडी व आत मध्ये अडकलेला चालक यांना काढण्याचे कार्य सुरू आहे.