Pune: दोन कट्टे, चार जिवंत काडतुसासह रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद; खंडणी विरोधी पथकाची कामगिरी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2023 05:03 PM2023-08-07T17:03:14+5:302023-08-07T17:05:15+5:30
लोणी काळभोर पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला...
- किरण शिंदे
पुणे :पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने पोलिसांच्या रेकॉर्डवर असणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला बेड्या ठोकल्या आहेत. या गुन्हेगाराच्या ताब्यातून देशी बनावटीचे पिस्टल आणि चार जिवंत काढत असे जप्त करण्यात आली आहेत. साहस विश्वास पोळ (वय 24, सिद्धिविनायक अपार्टमेंट वडकी गाव पुणे मुळगाव वीर परींचे तालुका पुरंदर) असे अटक करण्यात आलेल्या या साहित्याची नाव आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, बेकायदेशीररित्या पिस्तूल जवळ बाळगणाऱ्या गुन्हेगारांची माहिती पुणे पोलिसांकडून काढली जात होती. त्यानुसार खंडणी विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार सुरेंद्र जगदाळे आणि सचिन अहिवळे यांना गुन्हेगार साहस पोळ याच्या विषयी माहिती मिळाली होती. त्यानुसार उरुळी देवाची परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या अंग झडतीत देशी बनावटीचे दोन पिस्टल आणि चार जिवंत काडतुसे सापडले. ही शस्त्र जप्त करून त्याच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियमन कलम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, पोलीस उपनिरीक्षक मोहनदास जाधव यांच्यासह पोलीस कर्मचारी शंकर संपते, अमोल पिलाने, राहुल उत्तरक,र आशा कोळेकर यांच्या पथकाने केली.