Pune Crime: जीममध्ये दाम्पत्याला आरेरावी करत केली मारहाण, चार जणांवर गुन्हा दाखल

By नितीश गोवंडे | Published: December 28, 2023 04:25 PM2023-12-28T16:25:27+5:302023-12-28T16:26:17+5:30

याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

A couple was assaulted in a gym, a case was registered against four people | Pune Crime: जीममध्ये दाम्पत्याला आरेरावी करत केली मारहाण, चार जणांवर गुन्हा दाखल

Pune Crime: जीममध्ये दाम्पत्याला आरेरावी करत केली मारहाण, चार जणांवर गुन्हा दाखल

पुणे : सोसायटीच्या जीममध्ये व्यायाम करण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला ‘जीम मधून बाहेर जा’ असे म्हणत चार जणांनी शिवीगाळ केली. तसेच जीम मधील कठीण वस्तूने डोळ्यावर मारून गंभीर जखमी केल्याचा प्रकार कोंढवा परिसरात घडला आहे. हा प्रकार एनआयबीएम रोडवरील एलीना लिव्हींग सोसायटीच्या जीममध्ये मंगळवारी (दि. २६) रात्री नऊच्या सुमारास घडला. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी जखमी संदिप आगरवाल यांची पत्नी श्वेता संदिप आगरवाल यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात बुधवारी (दि. २७) फिर्याद दिली आहे. यावरून रुपेश चव्हाण (३५), सागर शेजुळ (३७), राजू बिंद्रा (४०) आणि सॅम्युअल (३५, सर्व रा. एलीना लिव्हींग, एनआयबीएम रोड, मोहम्मदवाडी) यांच्यावर  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकाच सोसायटीत राहतात. मंगळवारी रात्री फिर्यादी व त्यांचे पती सोसायटीच्या जीममध्ये गेले होते. त्यावेळी आरोपी रुपेश चव्हाण याने ‘हि जिम सोसायटीमधील ए व बी विंग मधील सभासदांसाठी नाही, तुम्ही बाहेर जा’ असे म्हणत श्वेता यांच्या पतीसोबत वाद घालून शिवीगाळ केली.
त्यावेळी श्वेता या मध्यस्थी करत असताना सॅम्युअल त्यांच्या अंगावर धावून आला, आणि त्याने तुम्ही जिममध्ये येऊ शकत नाही असे सांगण्यास सुरूवात केली. त्याचवेळी राजू बिंद्रा याने संदिप आगरवाल यांना पाठीमागून पकडले. तर रुपेश चव्हाण याने जीममधील कठीण वस्तूने संदीप यांच्या डाव्या डोळ्यावर मारून गंभीर जखमी केले. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक वैभव सोनावणे करत आहेत.

Web Title: A couple was assaulted in a gym, a case was registered against four people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.