Sinhagad Fort: सिंहगडाच्या पायवाटेवर कोसळली दरड ! पर्यटकांनी काळजी घ्यावी, वन विभागाचे आवाहन

By श्रीकिशन काळे | Published: July 14, 2024 02:46 PM2024-07-14T14:46:49+5:302024-07-14T14:49:02+5:30

पावसाळ्यात गड-किल्ल्यांच्या परिसरात दरडी कोसळण्याच्या घटना घडतात, अशा परिस्थितीत पर्यटकांनी पायवाटेने जाणे टाळावे

A crack collapsed on the path of Sinhagad Tourists should be careful forest department appeals | Sinhagad Fort: सिंहगडाच्या पायवाटेवर कोसळली दरड ! पर्यटकांनी काळजी घ्यावी, वन विभागाचे आवाहन

Sinhagad Fort: सिंहगडाच्या पायवाटेवर कोसळली दरड ! पर्यटकांनी काळजी घ्यावी, वन विभागाचे आवाहन

पुणे: दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून, रविवार असल्याने अनेक पर्यटक किल्ले सिंहगडावर फिरायला जातात. पण रविवारी पहाटे पायवाटेवर दरड कोसळली, त्यामुळे रस्ता बंद झाला. त्या मार्गावरून जाताना पर्यटकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

पावसाचे दिवस असल्याने पुणेकर घराबाहेर पडत आहेत. पर्यटनस्थळांवर गर्दी करत आहेत. किल्ले सिंहगड हा तर पुणेकरांच्या सर्वात आवडते पर्यटनस्थळ आहे. या ठिकाणी एरव्ही देखील गर्दी होते. रविवारी तर प्रचंड गर्दी पहायला मिळते. किल्ल्यांवर फिरायला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पण, पावसाळ्यात गड-किल्ल्यांच्या परिसरात दरडी कोसळण्याच्या घटना घडतात, अशा परिस्थितीत पर्यटकांनी पायवाटेने जाणे टाळावे, असे आवाहन केले आहे.

सिंहगडाच्या पायवाटेवर दररोज शेकडो पर्यटक ये-जा करतात. रविवारी पहाटे दरड कोसळल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. दरस कोसळलेल्या भागात मोठमोठी दगडं पडलेली आहेत. आजपर्यंत पायवाटेवर कधी दरड कोसळल्याची घटना घडलेली नव्हती. पण आता घडली आहे. म्हणून या पायवाटेवर जाताना योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे.

गेल्या तीन दिवसांपासून सिंहगड परिसरामध्ये चांगला पाऊस होत आहे. त्यामुळे पाय वाटेवर घसरण झाली आहे. पायवाटांवरून जाताना संततधार पावसामुळे दगडं मोकळी होऊन दरड कोसळू शकते. अपघात होण्याचा धोका वाढला आहे. पावसाचे पाणी मुरल्यामुळे दरड कोसळते आहे. म्हणून पर्यटकांनी दगडांवर बसून फोटो काढणे, सेल्फी काढण्याचे टाळावे. अन्यथा एखाद्या दगडावर बसल्याने तो निसटू शकतो आणि अपघात होऊ शकतो.

Web Title: A crack collapsed on the path of Sinhagad Tourists should be careful forest department appeals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.