निर्दयीपणाचा कळस! जाणीवपूर्वक मर्सिडिझ बेन्झ अंगावर घालून कुत्र्याचा बळी, स्वारगेट परिसरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 12:25 PM2024-11-28T12:25:13+5:302024-11-28T12:25:46+5:30

कारचालकाला अटक करून त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, नागरिकांची मागणी

A dog was deliberately killed by a Mercedes Benz an incident in Swargate area | निर्दयीपणाचा कळस! जाणीवपूर्वक मर्सिडिझ बेन्झ अंगावर घालून कुत्र्याचा बळी, स्वारगेट परिसरातील घटना

निर्दयीपणाचा कळस! जाणीवपूर्वक मर्सिडिझ बेन्झ अंगावर घालून कुत्र्याचा बळी, स्वारगेट परिसरातील घटना

पुणे : पुण्याच्या स्वारगेट परिसरात निर्दयीपणाचा कळस पाहायला मिळाला आहे. मुक्या प्राण्याचा जाणीवपूर्वक आणि अत्यंत वाईट प्रकारे जीव घेण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. भरधाव मर्सिडिझ बेन्झ गाडी जाणीवपूर्वक कुत्र्याच्या अंगावर घालून त्याला ठार केले आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी कारचालकावर गुन्हा दाखल केला आहे. 

सचिन कटारिया, असे आरोपीचे नाव आहे. याबाबत पद्मिनी पिटर स्टंप (६५, रा. भवानी पेठ) यांनी स्वारगेट ठाण्यात फिर्याद दिली आहे. कारचालक सचिन कटारिया यांच्याविरोधात प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हा प्रकार स्वारगेट येथील पोर्णिमा टॉवरजवळील इव्हाज ग्रेस हॉटेलसमोर रविवारी (दि. २४) पहाटे साडेचारच्या सुमरास घडला. अधिक माहितीनुसार, अरुण पवार यांचा पाळीव कुत्रा डॉगी होता. पोर्णिमा टॉवरमध्ये सचिन कटारिया याचे कार्यालय आहे. त्याने मर्सिडिझ बेन्झ भरधाव चालवत जाणीवपूर्वक कुत्र्याच्या अंगावर गाडी घातली. यात चिरडल्याने कुत्र्याचा मृत्यू झाला. पोलिस उपनिरीक्षक सिरसाट तपास करत आहेत. 

जाणीवपूर्वक गाडी अंगावर घातली 

स्वारगेट परिसरात पाळीव कुत्र्याच्या अंगावर मर्सिडिझ बेन्झ घालून कटारिया यांनी कुत्र्याचा बळी घेतला आहे. कटारिया यांच्याविरोधात प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. कटारिया यांना अटक करून कडक कारवाई करण्यात यावी अशी त्या भागातील नागरिकांनी मागणी केली आहे. 

Web Title: A dog was deliberately killed by a Mercedes Benz an incident in Swargate area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.